मयुरीची अमरावती विद्यापीठ संघात तर आर्यनची विभागीय व्हॉलीबॉल संघात निवड

मयुरीची अमरावती विद्यापीठ संघात तर आर्यनची विभागीय व्हॉलीबॉल संघात निवड


प्रशांत भगत: राळेगाव

राळेगाव:- शहरातील क्रीडा संकुल येथे नवोदय क्रीडा मंडळाच्या मैदानावर व्हॉलीबॉल खेळाचा नियमीत सराव सुरू राहतो त्यामुळे येथील खेळाडूची विविध व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड होत असते त्यामुळे निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार करण्याचे काम नवोदय क्रीडा मंडळाच्या वतीने करण्यात येत असते त्यामुळे यावेळी नवोदय क्रीडा मंडळाची खेळाडू मयुरी दीपक चौधरी हीची तिसऱ्यांदा अमरावती विद्यापीठ व्हॉलीबॉल संघात निवड झाली आहे ती सद्या इंदिरा महाविद्यालय कळंब येथे शिक्षण घेत असून ती अमरावती विद्यापीठ संघाकडून मध्यप्रदेश येथे खेळायला जाणार आहे तर दुसरा खेळाडू आर्यन प्रकाश देवकर याची जळगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अठरा वर्षांआतील मुलाच्या व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी अमरावती विभागीय संघात निवड झाली असून तो सद्या राळेगाव येथील विराणी सायन्स कॉलेज येथे शिक्षण घेत आहे हे दोन्ही खेळाडू नवोदय क्रीडा मंडळाचे असून त्यांच्या मैदानावर सत्कार करण्यात आला यावेळी विनय मेडिकलचे संचालक विनय मुनोत, माजी खेळाडू विवेक लढी, सचिन एकोनकर व सत्कारमूर्ती मयुरी हीची आई भाऊ हे उपस्थित होते. यावेळी दोन्ही सत्कार मूर्ती यांनी आपल्या प्रदर्शनाचे श्रेय नवोदय क्रीडा मंडळाचे प्रमुख महेश भोयर प्रशिक्षक प्रफुल खडसे , नरेश दुर्गे , गणेश काळे व नवोदय क्रीडा मंडळाचे खेळाडू मोनू खान, प्रविण गिरी, निखिल ठाकरे, अंकित क्षिरसागर, सोनु खान,जय डोंगरे, सुरज उजवणें, सुरज भगत व आदित्य मरसकोल्हे  यांना दिले आहे .