आश्वासना नंतर उपोषण सुटले

आश्वासना नंतर उपोषण सुटले    

प्रशांत भगत:राळेगाव

राळेगांव :नगर पंचायत नी दिलेल्या  ठरावानुसार काम करावे या मागणी साठी राजेन्द्र दुरबुडे हे दि २० नोव्हंबर २०२३ ला तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसले होते . दि २१ नोव्हेबंर मंगळवार ला सा बा विभागाचे अभियंता अभिषेक बोरगमवार व न. प सि.ओ अनुप अग्रवाल यांनी उपोषण मंडपाला भेट दिली उपोषण कर्त्याशी चर्चा करून वरीष्ठा शी चर्चा करुन प्रश्न निकाली काढण्यात येईल असे आश्वासन दिले . यावेळस नगराध्यक्ष रविंद्र शेराम उपनगराध्यक्ष जानराव गिरी बाधकाम सभापती मंगेश राऊत राजू रोहणकर संजय दुरबुडे गणपत ताटेवार प्रदिप ठूने उपस्थीत होते      प्रभाग क्रमांक ८ मध्ये असलेल्या ओपन प्लेस मधे राळेगांव विभानसभा मतदार संघाचे आमदार प्रा डॉ . अशोक उईके यांनी विकासात्मक कामा करीता निधी दिला परंतु ओपन प्लेस मध्ये ट्रॅक करून सौदर्यी करण करून देण्या संदर्भात सा बा विभागाला ठराव दिला .  परंतु ठरावा प्रमाणे इस्टीमेट न करता काही जागे वर गट्टू  लावण्या संदर्भात   कामाच मोजनाप झाल . परंतु या संदर्भात आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचे बांधकाम सभापती मंगेश राऊत यांनी सांगीतले . राजेंद्र दुरबुडे यांचे घर ओपन प्लेसला लागून असलेल्या अंकतवार लेआऊट मधे आहे.  त्यांनी या ओपन प्लेस मध्ये आबाल वृद्धांना फिरण्याकरिता ट्रॅक असावा व लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणे व सौंदर्यीकरण यात करावे एकाच बाजूने गट्टू लावू नये असे पत्र सार्वजनिक बांधकाम विभाग राळेगाव व नगरपंचायतीला दिले या कडे दुर्लक्ष करून त्यांनी काम सुरू केल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता परंतु या पत्राचे कुठले उत्तर न दिल्याने दिनांक २० नोव्हेंबर 2023 ला राजेंद्र दुरबुडे प्रशासनाच्या विरोधात तहसील कार्यालय राळेगाव च्या समोर उपोषणाला बसले आज दिनांक 21 नोव्हेंबर 2023 ला दुपारी तीन वाजताच्या दरम्यान नगरपंचायत सि.ओ अनुप अग्रवाल  व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभिषेक बोरगमवार हे उपोषण मंडपात आले व त्यांनी उपोषण कर्त्याशी चर्चा केली यावेळेस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष रवींद्र शेराम उपस्थित होते नगरपंचायतीचे उपाध्यक्ष जानराव गिरी यांनी दोन्ही अधिकाऱ्यांशी चर्चा केली व उपोषण करता हा नगरपंचायतीच्या ठरावाप्रमाणे काम करा याच्यावर आग्रही आहे तसे तुम्ही करायला पाहिजे असे सांगीतले .  मला कुठेही .विश्वासात न घेता माझ्या प्रभागात काम करताना काय नेमकं करायला पाहिजे हे विचाराव हे  तुम्हाला वाटले नाही का असे मंगेश राऊत यांनी सांबा विभागाला  विचारणा केली यानंतर उपोषण कर्ते राजेन्द्र दुरबुडे यांच्याशी चर्चा झाली अभिषेक बोरगिनवार यांना लेखी आश्वासन दिले . वरिष्ठांशी चर्चा करून हा प्रश्न सोडविण्यात येईल असे सांगीतले आश्वासना नंतर उपोषण सुटले यावेळेस गणपतराव ताटेवार किशोर वाघ प्रदीप महल्ले  रोहित वर्मा,प्रवीण ओंकार,किशोर झाडे ,श्याम धुर्वे,प्रवीण काकडे नितीन कोमेरवार सोमेश्वर राऊत पराग मानकर, श्रीकांत कोदाणे प्रफुल खेलपांडे दिलीप मानकर सुनील राऊत अमित मसमे बंटी राऊत दिनेश चांदोरे गणेश कुडमथे  प्रमोद अमृतकर सुनील ढोरे अशोक भागवत उपस्थित होते या उपोषण मंडपाला पत्रकार महेश शेंडे अशोक पिंपरे फिरोज लाखांनी राष्ट्रपाल भोंगाडे विशाल मासुरकर मिलिंद धनविज मनोहर बोभाटे  गुडडू मेहता  अप्सर  अली सैय्यद   . प्रमोद अमृतकर, ऍ.वैभव पंडित,अपसर काझी,खैरकर साहेब, भानुदास आत्राम यांनी भेट दिली आश्वासनानुसार काम अधिकारी  करतील अशी आपल्याला आशा आहे असे उपोषण करते राजेंद्र दुर बूडे यांनी उपोषण सोडताना मत व्यक्त केले