Mock Drill: माॅक ड्रील संपन्न झाले म्हणजेच घटना निर्माण होईल असे नाही मात्र नागरिकांनी जागरूक राहणे नितांत गरजेचे,तहसीलदार उत्तम निलावाड
मारेगाव:मा. श्री विकास मिना साहेब जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या आदेशानुसार आणि मा. श्री नितीशकुमार हिंगोले साहेब उपविभागीय अधिकारी वणी यांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक आपत्ती २०२५ च्या अनुषंगाने मौजे नवरगांव तालुका मारेगांव येथील प्रकल्पात वर्धा नदी पात्राचे लगत असलेल्या मारेगांव, वणी तालुक्यातील मौजा सावंगी, कोसारा, आपटी, शिवणी धोबे इत्यादी गावातील सरपंच, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल आधिकारी, महसूल सेवक, पोलीस पाटील पट्टीचे पोहणारे व्यक्ती आणि पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे उपस्थितीत माॅक ड्रील संपन्न
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती उत्तम निलावाड, तहसीलदार मारेगांव, भिमराव व्हनखंडे गटविकास अधिकारी प.स. मारेगांव, गावंडे पोलीस उपनिरीक्षक, सतीश मुन्न आपत्ती व्यवस्थापक प्रमुख जिल्हा कार्यालय यवतमाळ आणि त्याचे चम्मू उपस्थित होते. उपस्थित चम्मूने तलावात बोट टाकून पाण्यात अडकलेल्या व्यक्तींना सुरक्षित स्थळी/ ठिकाणी हालवून त्याचा कसा बचाव करायचा या बाबत सविस्तर माहिती देऊन बोट चालविण्याचे प्रशिक्षण दिले. तहसीलदार यांनीही प्रशिक्षण मोठ्या उत्साहाने प्रशिक्षण घेतले असल्याचे समजते...
तहसीलदार मारेगांव यांचे तालुक्यातील नागरिकांना आवाहन तालुक्यातील मागील दोन वर्षात आलेला अनुभव असा आहे की, पावसाळ्याच्या काळात नदी, नाल्यांना पुर येऊन, पुलावरुन, रस्त्यावरुन पाणी वाहत असताना काही वाहन धारक विचार न करता वाहने टाकतात त्यामुळे वाहन वाहुन जाऊन जिवितहानी होण्याची शक्यता असते असे न करता पाणी उत्तरे पर्यंत वाहन पुलावरुन/रस्त्यावरुन घेऊन जाऊ नये असे आवाहन केले आहे.