दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एक जागीच ठार, २ गंभीर जखमी
मांगरुळ जवळील घटना
सचिन मेश्राम -मारेगाव
मारेगाव ते वणी राज्य महामार्गावर मांगरूळ जवळ दोन दुचाकीची समोरा समोर जबर धडक झाल्याने यात एक दुचाकी चालक जागीच ठार झाला तर २ गंभीर जखमी झाले असून ही घटना आज दि २६ ऑक्टोंबर रोज गुरूवारला रात्री 8 वाजताचे सुमारास वणी मारेगाव राज्यमहामार्गावर मांगरूळ जवळील ही घटना घडली.
हितेश संजय पारखी वय सुमारे 25 वर्ष रा.मदनापुर ता.मारेगाव असे ठार झालेल्या दुचाकी चालकाचे नाव असुन राघो चांदबा कोरझरे वय सुमारे ४२ वर्ष व मोहन बापुराव मजगवळी वय सुमारे 40 वर्ष दोघेही रा.मंगरूळ ता.मारेगांव असे अपघातात गंभीर जखमी नावे असुन काही कामानिमित्त मारेगाव येथे गेले होते तेथील काम आटोपुन आपल्या गावाकडे येत असताना मांगरुळ जवळील वणीकडून मारेगावकडे जाणाऱ्या व मारेगावकडून मांगरूळकडे येणाऱ्या दोन्ही दुचाकीची समोरा-समोर जबर धडक झाली यात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर दुसऱ्या दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.