अखिल भारतीय गोंड आदिवासी संघाच्या जिल्हाअध्यक्ष पदी प्रल्हाद पेंदोर यांची निवड.
--------------------------------------------------------
राजू चव्हाण- घाटंजी
घाटंजी - तालुक्यातील माणूसधरी येथिल रहिवासी प्रल्हाद श्रीराम पेंदोर यांच्या सामाजिक,राजकिय व सांस्कृतिक कार्याची दखल घेत अखिल भारतीय गोंड आदिवासी संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा केळापूर - आर्णी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.संदीप धुर्वे यांनी नुकतेच नियुक्ती पत्र देवून जिल्हाअध्यक्ष पदी निवड केली आहे.
सतत आदिवासी समाजाचे हित अंगी जोपासून समाजासाठी कार्यरत राहणारे पेंदोर यांनी माणूसधरी गट ग्राम पंचायती मध्ये सदस्य म्हणून कार्य केले आहे.ते समाज बांधवांच्या हितासाठी स्वतःला झोकून घेतात.समाजावरील अन्यायाला वाचा फोडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.अश्यातच त्यांच्या कार्याची पोच पावती म्हणून व त्यांच्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक कार्याची दखल घेत अखिल भारतीय गोंड आदिवासी संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा केळापूर आर्णी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. संदीप धूर्वे यांनी त्यांची यवतमाळ जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड केली असून समाजहीत डोळ्यासमोर ठेवून समाजासाठी कार्य करावे असे नियुक्ती पत्रात नमूद केले आहे. आमदार डॉ. संदीप धूर्वे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रल्हाद पेंदोर एक जिद्दी आणि साहसी व्यक्तीमत्वाचे आहे. याबाबत त्यांना विचारले असता आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला आपण कधीच तडा जाऊ देणार नसून आदिवासी गोंड समाजासाठी जिल्हाभर सात्यत्याने कार्यरत राहणार आहे.माझ्या या निवडीने आनंद झाला असून आपण अखिल भारतीय गोंड आदिवासी संघाचे जिल्हाभर निवड प्रक्रिया लवकरच राबविणार असल्याचे सांगितले.ते आपल्या निवडीचे श्रेय आमदार डॉ. संदीप धूर्वे यांना देत आहेत.त्यांच्या या निवडीने सर्वत्र स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.