मारेगाव : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा अटकेत

मारेगाव : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा अटकेत

अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या लखन ला मारेगाव पोलिसांनी केली अटक.


 मारेगाव। शहारामधील एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमाचा बनाव रचून तिच्यावर शारिरिक अत्याचार केल्याची घटना बुधवार (दि.१४) उघडकीस आली. याप्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपीला वणी येथून  पोलीसांनी बेड्या ठोकल्या.

अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत आरोपी लखन रावत (रा.मारेगाव) याने तिच्यावर प्रेम करतो असे सांगून बनाव केला. व आरोपीच्या रूममध्ये बोलून अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरोधात तिच्यावर शारिरिक अत्याचार केला असल्याची मारेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून आरोपीविरोधात कलम 376.376(3), 506 पोक्सो.4.6 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी लखन याला वणी येथून अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव पोलिस  करीत आहेत.