वाहतूक व्यवस्था सुरळीत करा;ठाणेदार साहेब...- जागृती विचार मंचचे पोलिसात निवेदन

वाहतूक व्यवस्था सुरळीत करा;ठाणेदार साहेब...

- जागृती विचार मंचचे पोलिसात निवेदन



  सचिन मेश्राम: मारेगाव

 मारेगावात दिशाहीन झालेली वाहतूक अपघातास निमंत्रण देत आहे.सोबत अठरा वर्षाआतील विद्यार्थ्यांची भरधाव दुचाकी नियंत्रित करण्याची गरज असून यावर पोलीस प्रशासनाने तात्काळ उपाययोजना राबवावी अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा गर्भित ईशारा जागृती विचार मंच ने आज मंगळवारला पोलिसात दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
     मारेगाव शहरातील दुतर्फा वाहतुकीने रस्त्यासह पादचाऱ्यांची प्रचंड हेळसांड होते आहे.वाहन धारक ऐन रस्त्यावर दुचाकी ठेवून रस्त्यावर अघोषित रास्ता रोको करीत येजा करणाऱ्यास मनस्ताप सहन करावा लागत आहे.अल्पवयीन मुलांचेही वाहन चालविण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.भरधाव चालविणाऱ्या वाहनाने अपघाताची शक्यता बळावली आहे.
     यावर अंकुश लावून तात्काळ उपाययोजना राबवावी अन्यथा जागृती विचार मंच प्रतिकात्मक पोलीस कर्मचाऱ्याची भूमिका घेऊन पोलिस प्रशासनाचा रेशो कायम ठेवेल असा सज्जड दम निवेदनातुन देण्यात आला.
   पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सावंत यांना निवेदन देतांना जागृती विचार मंच चे अध्यक्ष जितेंद्र नगराळे , सचिव अँड.महेमुद खान , खालीद पटेल , उदय रायपूरे , दीपक डोहणे , राजू मोरे , अभय चौधरी , करण किंगरे , विप्लव ताकसांडे , प्रशांत नांदे ,कैलास ठेंगणे , आकाश बदकी , पंकज नेहारे , जुनेद पटेल ,  बदरुद्दीन सय्यद , शाहरुख ,लाभेष खाडे , चांद बहादे , सुरज वाढई आदींची उपस्थिती होती.