अनैतिक संबंधातून ‘त्या’ तरुणाचे हत्याकांड

अनैतिक संबंधातून ‘त्या’ तरुणाचे हत्याकांड



जळगावातील मेहरूण परिसरात राहणाऱ्या तरूणाचा निर्घृण खून केल्याचा धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. दरम्यान या हत्याकांडाप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे.

प्रमोद उर्फ भूषण सुरेश शेट्टी (वय ३३, रा. मेहरूण, जळगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे. भाड्याने घरात राहणाऱ्या विवाहितेसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून हा खून झाल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी जळगाव पोलीस कसून तपास करत असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

दोन दिवसांपासून प्रमोद बेपत्ता होता. त्याचा मृतदेह निमखेडी शिवारातील गिरणा नदीच्या काठावरील महादेव मंदीराजवळ आढळून आल्यानंतर मोठी खळबळजनक घटना उघडकीस आली. 

प्रमोद विद्यापीठात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होता. प्रमोद नेहमीप्रमाणे ड्युटी आटोपून घरी येण्यासाठी निघाला. पण दोन दिवस उलटूनही तो घरी परतला नाही. दरम्यान  त्याचा मृतदेह सोमवारी गिरणा नदीच्या काठावरील महादेव मंदीराजवळ आढळून आला.

एमआयडीसी पोलिसांनी खून करणाऱ्या संशयिताबद्दल माहिती काढली असता आरोपी जंगलात लपून बसल्याचं समोर आलं. दोघेही आरोपी जळगाव तालुक्यातील उमाळा येथील जंगलात लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी खून करणाऱ्या सत्यराज नितीन गायकवाड (वय 26, रा. गणेश नगर, जळगाव), सुनिल लियामतखाँ तडवी (वय 26, रा. पंचशील नगर, फुकटपुरा, तांबापुरा, जळगाव) या दोघांना अटक केली. या घटनेची पुढील तपास पोलीस करत आहे.