विचित्र अपघातात पादचारी ठार;चार गंभीर जंखमी बोटोणी येथील घटना

विचित्र अपघातात पादचारी ठार;चार गंभीर जंखमी 

           बोटोणी येथील घटना

मारेगाव-सचिन मेश्राम

मारेगाव : तालुक्यातील बोटोणी येथील करंजी- मारेगाव महामार्गावरील बोटोणी विसा गोठ्याच्या पूला लगत विचित्र अपघातात पादचारी जागीच ठार झाला. गोविंदा पांडुरंग खंडरे रा बोटोणी (६०) असे मृताचे नाव आहे.खंडरे हे सकाळी साडेदहा वाजता पायी शेताकडे जात असताना समोरून आलेल्या या चारचाकी ने दू दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीचा खंडरे यांना धक्का बसला असता त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.असुन दुचाकी वरील कुटुंब गंभीर जंखमी झाले असल्याची माहिती असून त्यांना वणी येथे उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गोविंदा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलिस करत आहे.