मारेगाव न्यायालयात सत्यपाल महाराज यांचा सत्कार
मारेगाव:-सुप्रसिद्ध कीर्तनकार सत्यपाल महाराज शहरात आले असता,मारेगाव दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायधीश निलेश वासाडे यांनी प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचा न्यायालयाच्या वतीने सहृदय सत्कार केला.
संपूर्ण महाराष्ट्रात प्रबोधन करनारे सत्यपाल महाराज यांचा मारेगाव न्यायालयात सोमवारला न्यायधीश निलेश वासाडे यांच्या हस्ते एका सहृदय कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्षस्थानी न्यायाधिश निलेश वासाडे,सत्कारमुर्ती सत्यपाल महाराज,इंजीनियर सौ.श्यामली निलेश वासाडे, अँड. परवेज पठाण,दुष्यंत जयस्वाल.पुंडलिक साठे.अँड पी.ए. भोयर, मेघा कोडपे,वर्षा गाणार मंचावर उपस्थित होते, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अँड. मेहमुद पठाण यांनी केले तर आभार प्रदर्शन लिपिक वैष्णवी कऱ्हाड यांनी मानले.