वणी येथिल कराटे बेल्ट वितरण मा.नितिनजी भूतडा यांच्या हस्ते संपंन्न
नियुद्ध फेडरेशन आँफ ईंडीया व ताईची असोसिएशन ईंडीया ,द्वारा आयोजित नगर भवन वणी येथे श्री. कैलाश बिडकर सर यांच्या कराटे क्लास मध्ये दिनांक 13 मार्च 2022 रोजी बेल्ट ग्रेडेशन परीक्षा घेण्यात आली होती. सदरील एक्झाम मध्ये ब्राऊन बेल्ट १ मेरुल बेल्ट ५ ब्ल्यु बेल्ट ७ ग्रिन बेल्ट ०८ आॕरेज बेल्ट १० आणि येलो बेल्ट १६ असे एकुण ४७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सदरील विद्यार्थ्यांंचे बेल्ट ग्रेडेशन घेण्याकरीता चंद्रपूर येथिल प्रशिक्षक श्री.विनोद पुणेकर ,श्री.निर्धार आसुटकर. श्री.विशाल चव्हाण यांनी बेल्ट ग्रेडेशन घेतले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी यवतमाळ जिल्ह्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष मा. श्री. नितीनजी भुतडा ,मा.आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार ,मा.श्री.संजयभाऊ पिंपळशेंडे . मा.श्री.तारेंद्रजी बोर्डे. मा.श्री.राजुभाऊ पडगीलवार. मा.श्री.रवीजी बेलुरकर , एडवोकेट मा.श्री.प्रफुल चव्हाण, मा. श्री.प्रतीक कुसलगे, मा. श्री.दिनकररावजी पावडे मा. श्री.बंडूभाऊ चांदेकर,सौ.संध्याताई अवताडे, सौ.प्रितिताई बिडकर,सौ.पुजाताई जाधव कु.दिप्ती ऊईके ईत्यादी मान्यवर ऊपस्थित होते.सदरील कार्यक्रमाचे सुञसंचालन श्री.विलास जाधव प्रयोगशाळा सहाय्यक यांनी केले . मान्यवरांच्या हस्ते ग्रेड एक्झाम मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व बेल्ट देऊन सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरवण्यात आले .सदरील कार्यक्रम वणी येथिल नगरभवन मध्ये श्री.कैलासजी बिडकर सर यांनी घडवून आणला व यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या व त्यांचा गौरव केला..