दोनशे रुपयांची लाच स्वीकारताना न्यायालयाच्या वरिष्ठ लिपिकास अटक

दोनशे रुपयांची लाच स्वीकारताना न्यायालयाच्या वरिष्ठ लिपिकास अटक

    

 
चिखली,  स्थानिक नगरपरिषद जवळ राहणारे इसमाच्या तक्रारीवरून  लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने टाकलेल्या सापळा कारवाईमध्ये प्रथमवर्ग न्यायालय भाग-1 येथे कार्यरत असणार्‍या लिपिकास लाचलुचपत खात्याने अटक केली.

सुनील बळीराम महाजन (वय 55 वर्षे) व्यवसाय नोकरी वरिष्ठ लिपिक प्रथम वर्ग न्यायालय 1 ले चिखली रा.एकता नगर बुलडाणा यांनी यातील तक्रारदार यांच्याविरुद्ध प्रथम वर्ग न्यायालय चिखली येथे कोर्ट खटला चालू असून या केस संदर्भात झालेल्या सुनावणीच्या नकला देण्यासाठी यातील आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचांसमक्ष 500 रुपयांची लाच मागितली.

सापळा कारवाई दरम्यान 200 रुपये लाच स्वीकारतांना वरिष्ठ लिपिकास रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या कार्यवाहीसाठी विशाल गायकवाड, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती, अरुण सावंत, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वी.अमरावती परिक्षेत्र, अमरावती, संजय चौधरी पोलिस उपअधिक्षक ला.प्र.वि.बुलडाणा यांचे मार्गदर्शन लाभले.