तीन दिवसांपासून ‘त्याची‘ सालेभट्टी परिसरात दहशत…नागरिकांत धास्ती...

तीन दिवसांपासून ‘त्याची‘  सालेभट्टी परिसरात दहशत…नागरिकांत धास्ती... 




गेल्या तीन दिवसांपासून त्याने  सालेभट्टी शिवारात  बस्तान मांडले आहे. त्यामुळे गावकरीही भयभित झाले आहेत.  दि. 24फेब्रुवारी रोजी  तुळशीराम लोनसावळे यांच्या गाईंचा फडशा पाडला होता. मात्र वनविभागाने कोणतीच दखल घेतली नाही.  वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे




मारेगाव : मारेगाव वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या सालेभट्टी या भागात वाघ असल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  यामुळे येथील पशुपालकांसह सर्वसामान्य नागरिकांत चांगलीच भीती निर्माण झाली आहे.

गत तीन दिवसांपासून सालेभट्टी शेत शिवाराला लागून असलेल्या फिस्की जंगल भागात नागरिकांना  वाघांचे दर्शन घडले असल्याने काहीना  वाघाच्या पायाचे ठसे दिसल्याने अनेकांची भंबेरी उडाली आहे. यामुळे वनविभागाने गावातील निवासी वसाहतीत मुक्‍काम करून या वाघापासून गावकऱ्यांचे रक्षण करावे, अशी मागणी सालेभट्टी  गावकऱ्यांनी केली आहे.

 सालेभट्टी परिसरात वाघाने बस्तान मांडले आहे. त्यामुळे जंगलव्याप्त असलेल्या या गावात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गस्त वाढवून या वाघाला परिसरातून हाकलून गावकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. वनविभाग मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे.