दोन दुचाकींची समोरासमोर धडक ; एका जणाचा मृत्यू तर दोन जखमी मुलचेरा तालुक्यातील घटना

दोन दुचाकींची समोरासमोर धडक ; एका जणाचा मृत्यू तर दोन जखमी

मुलचेरा तालुक्यातील घटना



दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत एक जण ठार झाल्याची घटना बुधवारी मुलचेरा तालुक्यात घडली. सुधीर सुकुमार रॉय (55) रा.भवानीपूर असे अपघातात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
मुलचेरा तालुक्यातील गोमणी येथे आठवडी बाजार असल्याने भवानीपूर येथील सुधीर रॉय हे भवानीपूर वरून दुचाकीवर भाजीपाला घेऊन गोमणीकडे जात होते. अजय ढाली आणि बाबू बाच्छाळ हे काम करून भवानीपूरकडे परत येत असताना बुधवारी दुपारी दोन ते अडीच वाजताच्या दरम्यान आंबटपल्ली जवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात तिघेही जखमी झाले. त्यांना ग्रामीण रुग्णालय मुलचेरा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु सुधीर रॉयची प्रकृती चिंताजनक असल्याने बुधवारी रात्रो त्याला चंद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र, रुग्णालयाकडे जात असताना वाटेतच कोठारीच्या जवळपास अखेरचा श्वास घेतला.
अजय ढाली आणि बाबू बाच्छाळ या दोघांवर मुलचेरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. रात्री उशिर झाल्याने सुधीर रॉय यांचा गुरुवारी मुलचेरा येथे शवविच्छेदन करण्यात येत आले. पुढील तपास मुलचेरा चे ठाणेदार प्रशांत जुमडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पारडे करीत आहेत