खासदारानी प्रकल्पाचे श्रेय लाटण्याचे काम करू नये -आमदार नरेंद्र भोंडेकर
भंडारा, दि.२३ सप्टेंबर:- शहराचा चेहरा मोहरा बदलविण्यासाठी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे
आठ महिण्यापासुन पाठपुरावा केल्यानंतर
भंडारा नगर परिषदेला
भुयारी गटारी प्रकल्पाला १६७ कोटी पैकी ११६ कोटीचा पहिल्या टप्प्यातील योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. हे सर्व आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या अथक परिश्रमामुळे झाले आहे. माञ या प्रकल्पाचे श्रेय लाटण्याचे काम खासदार सुनील मेंढे यांनी करू नये अशी प्रखर टिका आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे. ते शासकीय विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
भुयारी गटारी प्रकल्पाला १६७ कोटी पैकी ११६ कोटीचा पहिल्या टप्प्यातील योजनेला प्रशासकीय मान्यता प्राप्त करण्यात आली आहे.
मात्र भंडारा- गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे यांचे बॅनर जागोजागी लावल्याने ही योजना नेमकी कोणी आणली ? ही योजना राज्य सरकारची की, केंद्र सरकारची आहे. हेच खासदारांना माहीत नाही. म्हणून या योजनेअंतर्गत भंडारा वासियांना भूलथापा देण्याचे काम खासदार सुनील मेंढे हे बॅनरच्या माध्यमातून करत आहे.
माञ या प्रकल्पाचे श्रेय लाटण्याचे काम खासदार सुनील मेंढे यांनी करू नये असे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले.
त्यावेळी अनिल गायधने, जाॅकी रावलानी, संजय रेहपाडे, मुकेश थोटे, सुरेश धुर्वे, शैलेश खरोले, ललीत बोंद्रे, गौरी मोरकुरे व शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.