आकाश बदकी यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती

आकाश बदकी यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाच्या प्रदेश सचिवपदी  नियुक्ती



मारेगाव | प्रतिनिधी

अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) ओबीसी विभागाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली असून, यवतमाळ जिल्ह्यातील युवा नेतृत्व आकाश बदकी यांची 'प्रदेश सचिव'पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे मारेगावसह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

AICC ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनिल जयहिंद यांच्या स्वाक्षरीने ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. राज्यभरातील ओबीसी समाजाचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे, पक्ष संघटना तळागाळापर्यंत मजबूत करणे आणि युवा कार्यकर्त्यांना संघटित करण्याची महत्त्वाची जबाबदारी आकाश बदकी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

आकाश बदकी यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे यवतमाळ जिल्ह्याला प्रदेश पातळीवर अधिक बळ मिळणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

या नियुक्तीबद्दल आकाश बदकी यांनी माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभाताई धानोरकर, माजी आमदार वामनराव कासावार, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नरेंद्र पाटील ठाकरे, जिल्हाध्यक्ष ॲड. सचिन नाईक, मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा, माजी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती अरुणाताई खंडाळकर, मारेगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष वसंतराव आसुटकर, अंकुश महापुर तसेच संजय रामचंद खाडे, सचिव – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांचे मार्गदर्शन, सहकार्य आणि विश्वासाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

आकाश बदकी यांच्या निवडीचे मारेगावसह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांकडून स्वागत करण्यात येत असून, त्यांच्या माध्यमातून ओबीसी समाजाचे प्रश्न अधिक प्रभावीपणे राज्य पातळीवर मांडले जातील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

0 Comments