वेगाव येथे तरुण शेतकरी पुत्राची आत्महत्या; परिसरात हळहळ

 वेगाव येथे तरुण शेतकरी पुत्राची आत्महत्या; परिसरात हळहळ



मारेगाव सचिन मेश्राम

मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील रहिवासी असलेल्या एका २२ वर्षीय तरुण शेतकरी पुत्राने गावा लगत असलेल्या शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना आज सकाळी उघडकीस आली. विश्वास व्यासनाथ मत्ते, असे मृत तरुणाचे नाव आहे.


​मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली. विश्वास याने गावा लगत असलेल्या देरकर यांच्या शेतामध्ये जाऊन सागवानाच्या झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेची प्राथमिक माहिती अनिल पाटील देरकर यांनी मारेगाव पोलीसांना  दिली आहे.



​तरुण विश्वास मत्ते याने उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे मत्ते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, आई-वडिलांचा आधार हरपला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

​घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या प्रकरणी मर्ग (अपमृत्यू) दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments