कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 'जागतिक योग दिन' उत्साहात साजरा

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 'जागतिक योग दिन' उत्साहात साजरा

सचिन मेश्राम -मारेगाव 

​मारेगाव: २१ जून रोजी 'आंतरराष्ट्रीय योग दिना'चे औचित्य साधून येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी सामूहिक योगासने करून निरोगी जीवनाचा संकल्प केला.
​कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि योग दिनाचे महत्त्व विशद करून करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे म्हणाले की, "योगाभ्यास केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसून तो आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य भाग असणे आवश्यक आहे. नियमित योगामुळे केवळ शारीरिक तंदुरुस्तीच मिळत नाही, तर मानसिक शांतता आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो. दीर्घ आणि आनंदी आयुष्यासाठी योगासने व प्राणायामाची सवय लावणे काळाची गरज आहे."
​कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे योग प्रशिक्षक तथा शारीरिक शिक्षण संचालक डॉ. नितेश भा. राऊत यांचे मार्गदर्शन. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाचा सराव केला.
​हा कार्यक्रम महाविद्यालयाचा शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून योग दिन उत्साहात साजरा केला.

Post a Comment

0 Comments