​'भाडखाऊ मामा'चा काळा कारनामा: दहा वर्षांपूर्वीचा 'प्रसाद' विसरला, पुन्हा रचतोय निष्पापांना अडवण्याचे घातक षड्यंत्र!

​'भाडखाऊ मामा'चा काळा कारनामा: दहा वर्षांपूर्वीचा 'प्रसाद' विसरला, पुन्हा रचतोय निष्पापांना अडवण्याचे घातक षड्यंत्र!


मारेगाव:

"लाथाळ्याने खेटरं खाल्ली तरी सुधारणार नाही" अशी म्हण मारेगावच्या एका तथाकथित 'भाडखाऊ मामा'च्या बाबतीत तंतोतंत लागू पडत आहे. दहा वर्षांपूर्वी तत्कालीन ठाणेदार नशिबकर यांनी या इसमाची मस्ती जिरवण्यासाठी त्याला दिलेला 'प्रसाद' आजही तालुक्यात चर्चेत आहे. मात्र, सुटलो तरी सुधारलो नाही, असे म्हणत हा समाजकंटक आता पुन्हा एकदा आपल्या जुन्या गुन्हेगारी वृत्तीने सक्रीय झाला आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी आता हा 'मामा' शिक्षक, पत्रकार, व्यापारी आणि शासकीय अधिकाऱ्यांना खोट्या गुन्ह्यांत अडवण्यासाठी 'पांढरे कागद काळे' करण्याच्या घातक षड्यंत्रात मग्न झाला आहे.

​सन्माननीय वर्गालाच लक्ष्य करण्याचे धाडस

​हा 'भाडखाऊ मामा' आता अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन काम करत आहे. समाजाचा कणा मानल्या जाणाऱ्या शिक्षकांना आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना खोट्या तक्रारींच्या जाळ्यात अडवण्याचे याचे कारस्थान चव्हाट्यावर आले आहे. जर कोणी याच्या दावणीला बांधले गेले नाही, तर त्याला विनयभंग किंवा खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यांत अडवण्याची धमकी देऊन दहशत माजवण्याचा याचा 'धंदा' सुरू आहे. भोळ्या-भाबड्या महिलांना समोर करून, त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निष्पाप लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणे, ही याची कार्यपद्धती बनली आहे.

​प्रशासकीय यंत्रणेची दिशाभूल

​हा इसम केवळ ब्लॅकमेलिंग करत नाही, तर आपल्या फायद्यासाठी खोटे अर्ज आणि कागदपत्रांमध्ये फेरफार करून प्रशासकीय यंत्रणेची दिशाभूल करण्याचे काम करत आहे. एखादा व्यापारी किंवा अधिकारी त्याच्या दबावात आला नाही की, त्याला खोट्या खंडणीच्या गुन्ह्यात गोवण्यासाठी हा इसम रात्रंदिवस 'कागद काळे' करण्यात व्यस्त असतो. कायद्याचा अनुभव असूनही, इतक्या हिमतीने तो पुन्हा गुन्हेगारीकडे वळतोय, हे पाहून सुज्ञ नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

​आता पुन्हा 'जुना प्रसाद' मिळणार का?

​दहा वर्षांपूर्वीच्या कारवायांचा इतिहास असलेल्या या इसमाला पुन्हा एकदा कायद्याचा बडगा दाखवण्याची वेळ आली आहे. अशा समाजकंटकामुळे मारेगावची प्रतिमा मलीन होत असून, तालुक्यात भीतीचे वातावरण आहे. आता प्रश्न असा पडतो की, या 'भाडखाऊ मामा'च्या पाठीशी नक्की कोणाचा वरदहस्त आहे? की पोलीस प्रशासन पुन्हा एकदा तोच 'जुना प्रसाद' देऊन याच्या मस्तीला लगाम घालणार?

जनतेची मागणी:

आता मारेगावचे पोलीस प्रशासन या 'भाडखाऊ मामा'च्या या कारवायांना वेळीच पायबंद घालणार का? की हा समाजकंटक आणखी एखाद्या निष्पाप व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वाट पाहणार? तालुक्यातील शिक्षक संघटना, पत्रकार आणि नागरिक आता या इसमावर कडक कारवाईच्या प्रतीक्षेत आहेत.

Post a Comment

0 Comments