मारेगावच्या मातीतील 'ब्लॅकमेलिंग'चा महाभयंकर 'कोळीसाळा'; ३० वर्षांपासून चाललेला तो 'भाडखाऊ' मामाचा काळा धंदा अखेर उघड!
मारेगाव | सचिन मेश्राम
विदर्भाच्या सामाजिक आणि प्रशासकीय वर्तुळात गेल्या तीन दशकांपासून एका अशा व्यक्तीचा दबदबा निर्माण झाला होता, ज्याच्या नावाने अनेक प्रामाणिक अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिक्षण संस्थांची झोप उडाली होती. ६० वर्षांचे वय ओलांडलेल्या या 'कथित मामा'चा चेहरा आता 'मारेगाव वार्ता'ने जनतेसमोर उघडा पाडला आहे. महिलांना मोहरा बनवून, प्रशासनाला ब्लॅकमेल करून आणि लोकांच्या अब्रूची बोली लावून स्वतःचे साम्राज्य उभारणाऱ्या या 'भाडखाऊ' प्रवृत्तीचा आता अंतकाळ जवळ आला आहे.
महिलांच्या अब्रूचा बाजार आणि 'लेटरपॅड'ची दहशत
गेल्या ३० वर्षांपासून या व्यक्तीने एका बोगस संघटनेच्या आडून अत्यंत किळसवाणा उद्योग चालवला आहे. गरजू आणि निष्पाप महिलांना संघटनेत मोठी पदे देण्याचे आमिष दाखवून त्यांना जाळ्यात ओढणे, हे त्याचे मुख्य तंत्र. एकदा महिला जाळ्यात आली की, तिच्या नावाचे लेटरपॅड वापरून अधिकारी आणि शिक्षण संस्थांविरोधात 'चारित्र्यहनन' करणारे खोटे अर्ज दाखल करायचे. या 'लिंगपिसाट' प्रवृत्तीने केवळ स्वतःचे खिसे भरण्यासाठी महिलांच्या प्रतिष्ठेचा वापर एका 'ढाल' म्हणून केला आहे, हे आता समोर आले आहे.
खंडणीचा 'ससेमिरा': 'दिवाळी' ते 'कार्यक्रमा'पर्यंत सर्वांची लूट!
या व्यक्तीचा दहशतवाद इतका मोठा आहे की, कोणतीही संस्था असो किंवा सरकारी कार्यालय, याला आर्थिक हिस्सा दिल्याशिवाय काम करणे अशक्य झाले होते. शाळेच्या दिवाळी बोनसपासून ते एखाद्या सामाजिक कार्यक्रमाच्या निधीपर्यंत, हा 'मामा' सर्रास पावती फाडण्याचा ससेमिरा लावत असे. ज्याने या खंडणीला नकार दिला, त्याला थेट मुख्यमंत्र्यांपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत खोट्या तक्रारींच्या जाळ्यात अडकवण्याची धमकी दिली जाते. अनेक प्रामाणिक लोक बदनामीच्या भीतीने आजवर गप्प राहिले, पण त्यांची हीच गप्प राहण्याची वृत्ती या 'भाडखाऊ' प्रवृत्तीला बळ देत गेली.
कागदी तोफखाने आणि 'काळ्या' कृत्यांची धडपड
सध्या या व्यक्तीची अवस्था 'उंदीर सापळ्यात अडकल्यासारखी' झाली आहे. आपले पितळ उघडे पडत असल्याचे पाहून, हा 'मामा' आता वेड्यासारखा कागदे काळी करत आहे. खोटे गुन्हे दाखल करणे, खोटी निवेदने देणे आणि प्रशासनाला चुकीची माहिती देणे ही त्याची जुनीच सवय आहे. पण आता मारेगावचा नागरिक जागा झाला आहे. आता तुम्ही कितीही कागदे काळी केली, तरी तुमच्या या 'काळ्या' धंद्याला सत्याचा लख्ख प्रकाश गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही.
'मारेगाव वार्ता'चा इशारा: आम्ही घाबरणार नाही, आम्ही थांबणार नाही!
२२ वर्षांच्या तरुणांना लाजवेल अशी 'विकृत' जिद्द बाळगणाऱ्या या ६० वर्षीय मामाला आम्ही ठणकावून सांगतो की, आता काळ बदलला आहे. ज्यांनी ३० वर्षे अनेकांचे संसार उध्वस्त केले, त्यांना आता स्वतःचे भविष्य अंधारात दिसत असेल. हा 'भाडखाऊ' कारभार आता मारेगावात चालणार नाही.
पीडितांना 'मारेगाव वार्ता'चे अंतिम आवाहन:
ज्या कोणाला या व्यक्तीने त्रास दिला आहे, ज्यांना ब्लॅकमेल करून लुटले आहे, त्यांनी आता भीती झटकून पुढे यावे. तुमची माहिती गोपनीय ठेवून, या भ्रष्ट प्रवृत्तीला तुरुंगाची हवा खाऊ घालण्यासाठी 'मारेगाव वार्ता' कटिबद्ध आहे. आता वेळ आली आहे या 'भाडखाऊ' प्रवृत्तीच्या साम्राज्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची!
सत्याचा विजय निश्चित... हा तर फक्त सुरुवात आहे!
- संपादक, मारेगाव वार्ता.
0 Comments