ॲड. विशाल गणात्रा यांची युवासेना लोकसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती

ॲड. विशाल गणात्रा यांची युवासेना लोकसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती


यवतमाळ:

शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार युवासेनेच्या संघटनात्मक निवडी जाहीर करण्यात आल्या असून, यात यवतमाळचे ॲड. विशाल राजेश गणात्रा यांची युवासेना यवतमाळ-वाशिम लोकसभा संपर्कप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

​युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व शिवसेना नेते संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी राज्यातील विविध लोकसभा संपर्कप्रमुखांच्या नियुक्त्या घोषित केल्या. ॲड. गणात्रा यांच्याकडे आता यवतमाळ आणि वाशिम या दोन्ही जिल्ह्यांतील युवासेनेच्या समन्वयाची जबाबदारी असणार आहे.

​या निवडीबद्दल जिल्हयातील युवासेना व शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या नियुक्तीमुळे आगामी काळात जिल्ह्यातील युवा संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

0 Comments