​राळेगावात 'मॅनेज' राजकारण? मजर कुरेशी प्रकरणातील सर्व आरोप बिनबुडाचे; माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके यांचा भाजपवर घणाघाती हल्ला!

​राळेगावात 'मॅनेज' राजकारण? मजर कुरेशी प्रकरणातील सर्व आरोप बिनबुडाचे; माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके यांचा भाजपवर घणाघाती हल्ला!

​यवतमाळ/राळेगाव (प्रतिनिधी):
गेल्या काही दिवसांपासून राळेगाव आणि संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात 'आदिवासी मुलींची तस्करी' आणि 'लव्ह जिहाद' सारख्या नावाखाली जे भीतीचे वातावरण निर्माण केले गेले, तो केवळ 'मतांच्या राजकारणाचा स्टंट' असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या गंभीर विषयावर माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंतराव पुरके यांनी आक्रमक पवित्रा घेत भाजपच्या 'थिल्लर' राजकारणाचे वाभाडे काढले आहेत.
​भाजपचे आरोप ठरले 'फुसका बार'!
​राळेगाव भाजपच्या वतीने या प्रकरणात मानव तस्करी आणि लव्ह जिहादचे अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले होते. मात्र, पोलीस प्रशासनाने केलेल्या तपासानंतर हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे सिद्ध झाले आहे. पिंपरी दुर्ग येथील बालविवाह प्रकरण हे पूर्णपणे वेगळे असून त्याचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. संशयित आरोपी मजर कुरेशी याच्यावर लावण्यात आलेले कोणतेही गंभीर गुन्हे अद्याप सिद्ध होऊ शकलेले नाहीत.
​आरोपी पोलिसांच्या खिशात आणि तलवार रस्त्यावर कशी?
​पोलीस तपासातील विसंगतीवर बोट ठेवताना पुरके सर म्हणाले की, "ज्या आरोपीवर मानव तस्करी आणि पोक्सो अंतर्गत गुन्हे लादण्याची तयारी होती, त्या मजर कुरेशीवर पोलिसांनी केवळ 'शस्त्र कायद्या' (आर्म्स ॲक्ट) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी शनिवारी रात्रीपासून पोलिसांच्या ताब्यात असताना तो काल रात्री शहरात तलवार घेऊन फिरत होता कसा? हा बनाव पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली केला?"
​मंत्री महोदयांनी उत्तर द्यावे - पुरके सरांचा सवाल
​दोन दिवस संपूर्ण राळेगाव मतदारसंघाचे वातावरण पेटवले गेले, आज शहर कडकडीत बंद ठेवले गेले. ज्या प्रकरणासाठी हा सर्व 'हाय व्होल्टेज ड्रामा' केला गेला, तो गुन्हाच कधी घडला नाही असे आता पोलीस स्वतः सांगत आहेत. यावर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आणि जबाबदार मंत्री महोदयांनी आता जनतेला उत्तर द्यावे की, केवळ निवडणुकीच्या तोंडावर समाजात तेढ निर्माण करण्यासाठी हे षडयंत्र रचले होते का?
​सत्ताधाऱ्यांचा 'नीच' स्टंट!
​प्रा. वसंतराव पुरके यांनी आपली प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, "मुलींच्या सुरक्षेचा विषय हा राजकारणासाठी नसून संवेदनशीलतेचा आहे. पण भाजपने केवळ आपली पोळी भाजण्यासाठी समाजात द्वेष पसरवण्याचे काम केले आहे. प्रशासनाने आता सत्य परिस्थिती जनतेसमोर ठेवून हा संभ्रम कायमचा दूर करावा.

Post a Comment

0 Comments