⚫ खड्डा चुकवताना ट्रॅक्टरचा तोल गेला; चालक अभय येरमे जागीच ठार

⚫ खड्डा चुकवताना ट्रॅक्टरचा तोल गेला; चालक अभय येरमे जागीच ठार


मार्डी | सचिन मेश्राम 

मार्डी परिसरात दुर्दैवी अपघातात ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टरचा तोल जाऊन वाहन उलटले आणि ट्रॅक्टरखाली दाबून चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना विद्युत वितरण कंपनीच्या सब-स्टेशनजवळ आज रविवार  सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान घडली.
मृत चालकाचे नाव अभय येरमे (वय अंदाजे २१ वर्षे, रा. मार्डी) असे असून तो कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. अपघात इतका भीषण होता की अभय यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई-वडील असा परिवार आहे. एकुलत्या एक मुलाच्या अकाली निधनामुळे येरमे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील प्रशांत पाटील यांनी तात्काळ पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.