पत्रकार नरेंद्र वैरागडे यांची राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती
नागपूर येथील ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र वैरागडे यांची अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना यांच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पूर्वी ही संघटना डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र या नावाने कार्यरत होती. त्या काळात नरेंद्र वैरागडे यांनी विदर्भ कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती. आता संघटना भारतीय स्तरावर कार्यरत असून तिच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, महासचिव विकास भोसले तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सतीश सावंत यांनी वैरागडे यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
नरेंद्र वैरागडे मागील ३५ वर्षांपासून मीडिया क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी पत्रकारितेत विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. ते वृत्तनामा न्यूज 24 या डिजिटल चॅनेलचे संपादक म्हणून कार्यरत आहेत.
त्यांच्या नियुक्तीमुळे डिजिटल माध्यम क्षेत्रात संघटनेची ताकद वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.