विकसित भारत संकल्प यात्रेचा वरध येथून शुभारंभ

विकसित भारत संकल्प यात्रेचा वरध येथून शुभारंभ


राळेगाव : प्रशांत भगत 

 सरकारच्या योजनांचा लाभ वंचित लाभार्थीपर्यंत पोहोचवावा यासाठी केंद्र सरकारच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा हि देशव्यापी मोहीम राबवण्यात आली आहे असे प्रतिपादन आमदार डॉ. अशोक ऊईके यांनी यावेळी केले वरध येथील ग्रामपंचायत सभागृहात यात्रेच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते यात्रेचा शुभारंभ आमदार डॉक्टर अशोक ऊईके, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार अमित भोईटे, गट विकास अधिकारी केशव पवार, यांच्या उपस्थित झाला यावेळी तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी, वन अधिकारी हटकर, विस्तार अधिकारी सुर्वे, भाजपा तालुकाध्यक्ष चित्तरंजन कोल्हे, माजी सभापती प्रशांत तायडे, डॉक्टर कुणाल भोयर,  संजय काकडे, विशाल पंढरपूरे, रंजीत ठाकरे, आशिष इंगोले, संदीप तेलंगे आधी उपस्थित होते विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याची संधी यात्रेच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे संकल्प यात्रेच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावात हे वाहन जाणार आहे यांच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे यात सहभाग नोंदवून नवीन लाभार्थींची नोंदणी करावी असे आमदार ऊईके यांनी सांगितले