राळेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत प्रथमच होणार 57 दुचाकी वाहनांचा लिलाव

राळेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत प्रथमच होणार 57 दुचाकी वाहनांचा  लिलाव


राळेगाव : प्रशांत भगत 

राळेगाव पोलीस स्टेशन मध्ये काही कारवाईत तर काही बेवारस आढळलेल्या दुचाकी अनेक वर्षापासून धूळ खात पडलेल्या आहेत या दुचाकी पोलीस ठाण्याच्या प्रांगणात सडत असून त्यामुळे प्रांगणाची जागा कमी झाली आहे. आता या दुचाकींचा लिलाव केला जाणार आहे ठाणेदार रामकृष्ण जाधव यांनी बेवारस अनेक दुचाकी वाहनांसंदर्भात वाहन मालकांना लेखी सूचना,तसेच वृत्तपत्रात जाहिरात दिल्या होत्या परंतु कोणीही आजपर्यंत दुचाकी वाहन मालकीबाबत दावा केला नाही त्यामुळे राळेगाव पोलीस ठाण्यातील आता एकूण 57 बेवारस दुचाकी शिल्लक राहिलेल्या आहेत त्यांचा वरिष्ठांच्या परवानगीने बुधवार दिनांक 13/12/2023 रोजी सकाळी 11 वाजता पोलीस स्टेशनमध्ये लिलाव ठेवण्यात आला आहे यावेळी इच्छुकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ठाणेदार रामकृष्ण जाधव यांनी केले आहे