अवकाळी ने कपाशी, तुर व रब्बी पिकांचे केले नुकसान सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची गरज

अवकाळी ने कपाशी, तुर व रब्बी पिकांचे केले नुकसान

  सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची गरज


राळेगाव : प्रशांत भगत 

राळेगाव तालुक्यात नुकत्याच झालेल्या दोन दिवसाच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या  खरीप व रब्बी दोन्ही हंगामातील पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले आहे. राळेगाव तालुक्यात ढगाळी वातावरण असून पावसाची शक्यता आहे कापूस, तूर, फळबाग, भाजीपाला, वर्गीय पिकाची प्रचंड नासाडी झाली आहे आधीच आसमानि व सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी कसेबसे पिके सावरली असताना  अचानक झालेल्या अवकाळी पावसाने पाणी फेरले गेले त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण करून राज्य शासनाने सरसकट  शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी होत आहे. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांनी तसे सूतोवाच केले असले तरी पंचांनामे सोपस्कर होऊन शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळणार कधी हा प्रश्न आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात या बाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे शेतकऱ्यांच्या नशिबी कोणते संकट कधी येईल याचा काही नेम नाही गत दोन वर्षापासून तालुक्यातील शेतकऱ्यांनी महापूराच्या संकटाची  अनुभूती घेतली यावर्षी सुद्धा हजारो हेक्टर जमिनीचे पिके पाण्याखाली सापडली असतानाही शेतकऱ्यांनी खचून न जाता मोठ्या मेहनतीने आपली पिके चांगले उत्पन्न होईल अशा अवस्थेत आणली. बोंडातून  कापूस बाहेर निघताच शुभ्र पांढरे राणाचे दृश्य त्यात आंतर पीक म्हणून तुरीच्या  ओळी सोनेरी रंगाच्या फुलांनी बहरल्या होत्या फळबागेतील लोंबत्या  फळाचे दृश्य आकर्षित दिसत होते भाजीपाल्यावर हिरवा शालू पांघरून असल्याचे चित्र संपूर्ण रानात दिसून येत होते हे नैसर्गिक सोंदर्य बघून यावर्षी समाधानकारक उत्पन्न होण्याचे स्वप्न शेतकऱ्यांच्या डोळ्यात होते मात्र अवकाळी
पावसाने शेतकऱ्याचे स्वप्न एका क्षणात भंग झाले कापूस ओलाचिंब होऊन 
लोंबू लागला पांढरा रंग काळपट झाला, पावसाने संपूर्ण पराठीचे बोंडे काळपट झाली तुरीचा सोनेरी रंग उडून गेला संपूर्ण बार पावसाने खाली पडला तीच अवस्था फळबाग व भाजीपाला वर्गीय पिकाची सुद्धा झाली आणि शेतकऱ्यांच्या खांद्यावर पुन्हा संकटाचे ओझे आले मात्र याचे कोणालाच सोयीसुतक नसल्याचे शेतकऱ्यांना वाटू लागले तालुक्यात ढिगाने असलेल्या कोणत्याच पुढाऱ्याने शेतकऱ्यांची साधी विचारणा केली नाही लग्न समारंभ तेरवीला हजेरी लावणारे नेते आता गेले तरी कुठे हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
................................
30नोव्हेंबर ला बंगालच्या उपसागरात कमीदाबाचा पट्टा तयार होऊन तीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले यालाच मिचान्ग असे नाव देण्यात आले 
तयार झालेल्या चक्रीवादळमुळे सध्या विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून ढगाळ वातावरण व हलक्या सरी कोसळत आहे शेतीचा उत्पादन खर्च वाढला आहे शेतमालाला योग्य बाजार भाव नाही शेतकरी संकटात आहे अशावेळी तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळायला हवी शासन घोषणा करते पण प्रत्यक्षात ठोस मदत मिळत नाही विमा कंपनी शेतकऱ्यांचे फसवणूक करीत आहे शेतकरी आत्महत्येचा प्रश्न बिकट बनला असताना शेती फायद्याची व्हावी यासाठी महत्त्वकांक्षी धोरणात्मक निर्णय घेण्यात गेले पाहिजे
----जानराव गिरी---
उपाध्यक्ष नं. प. राळेगाव