चिखलवर्धा येथे शांतता व सुव्यवस्था समितीची बैठक संपन्न
------------------------------------------------
घाटंजी -राजु चव्हाण
घाटंजी - पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या चिखलवर्धा ह्या गावात सर्वच जाती धर्माचे लोक वास्तव्यास असून मराठवाडा सीमेलगत लागून आहे.याठिकाणी पुढे होणारे उत्सव शांततेत व्हावे या दृष्टीकोनातून दिनांक १ सप्टेंबर रोज शुक्रवारला पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रविण लिंगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता व सुव्यवस्था समितीची बैठक संपन्न झाली.
आगामी काळात येणारे गणेश उत्सव, पोळा यासह विविध कार्यक्रम सर्व समाजबांधवांनी सलोख्याने राहून कायद्याचे पालन करून सामाजिक सलोखा निर्माण करून कसे साजरे करता येईल यासाठी पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या चिखलवर्धा या गावी ग्राम पंचायत कार्यालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.सर्व प्रथम काही दिवसापूर्वी रुजू झालेले ठाणेदार प्रविण लिंगाडे यांचे गावकऱ्यांच्या वतीने आदिवासी समाजाचे महाजन सखाराम कुळसंगे यांचे हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर गावात उदभवणाऱ्या समस्येवर चर्चा करण्यात आली.यावर मार्ग कसे काढावे पोलिसांची मदत जनतेनी कशी घ्यावी याबाबत या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असलेले ठाणेदार प्रविण लिंगाडे यांनी सविस्तर माहिती देत मार्गदर्शन केले.यावेळी या बैठकीला पोलिस उप निरीक्षक वानखेडे, बिट जमादार अविनाश मुंडे, पो. शि.वाढई,यांचे सह गावचे सरपंच आकाश नडपेलवार, ग्राम पंचायत सदस्य जैतुजी मेश्राम, माजी सरपंच अर्जुन जाधव कुसुम चव्हाण हे प्रामुख्याने उपस्थित होते.तर बचत गटाच्या महिला, आशा स्वयंसेविका,तथा मंगला कनाके, निता कनाके, गुंफा जाधव, जया कनाके, सुधाकर चव्हाण पारवा सोसायटी उपाधक्ष्य,पोलीस पाटील गणेश कुमरे, सामजिक कार्यकर्ता रमेश राठोड,मुस्लिम धर्मगुरू हाफिज साहब, ज्येष्ठ नागरिक रफिक पटेल, लक्ष्मण केलझरकर,लक्ष्मण नेवारे, तंटामुक्ती अध्यक्ष अबरार पटेल, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास नेवारे,मारोती मडावी,कैलास जाधव, शिवराम जाधव, जोतिराम चव्हाण,पूनाजी मेश्राम, अशपाक शेख, वसिम पठाण,जुबेर खान,सचिन बोटरे, शंकर धूर्वे यांचे सह सर्व धर्मिय समाज बांधव उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन सुनिल कुमरे यांनी केले.