मारेगावचे तहसीलदार उत्तम निलावाडचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध

मारेगावचे तहसीलदार उत्तम निलावाडचे  जात वैधता प्रमाणपत्र अवैध 

मारेगाव -सचिन मेश्राम

मारेगाव:विभागाच्या किनवट येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने औरंगाबाद विभागातील बनावट 'कास्ट व्हॅलिडिटी' धारक तहसीलदार दत्तात्रय बळीराम निलावाड  यांच्या रक्त नातेसंबंधातील नातेवाईक असलेल्या १७ जणांच्या 'कास्ट व्हॅलिडिटी' रद्द केली आहेत. माधव बालाजी निलावाड ,भानुदास बळीराम निलावाड,उत्तम सयाजी निलावाड ,ज्योत्स्ना व्यंकटराव निलावाड,नागेश व्यंकटराव निलावाड, मयुरी माधवराव निलावाड ,सुभाष बालाजी निलावाड ,दत्ता बळीराम निलावाड ,मारोती बळीराम निलावाड ,व्यंकटी बळीराम निलावाड ,स्नेहा व्यंकटराव निलावाड ,सुप्रिया माधवराव निलावाड , स्वप्निल व्यंकटराव निलावाड , शीतल उत्तम निलावाड,पंकज मारोती निलावाड ,नरेंद्र सुभाष निलावाड,नेहा सुभाष निलावाड यांच्या सह आठ जण अजुन  औरंगाबाद समितींच्या निशाण्यावर आहे. अनुसूचित जमाती पडताळणी समितीने एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट कास्ट व्हॅलिडीटी प्रमाणपत्र रद्द करण्याची ही पहिलीच वेळ आहे.