बेला ग्रा.प . सरपंचाने भक्त निवासाला बनवले जिमखाना
बेला प्रतिनिधी : कैलास म .साठवणे
:- बेला मसंनपेठ शिवारात वेना नदीच्या तीरावर लभान बुवा शिवमंदिर उभे आहे. या मंदिराला महाराष्ट्र शासनाकडून सन 2009 मध्ये तीर्थक्षेत्र फंडातून सोळा लाखाचा निधी मंजूर करण्यात आला. आणि याच निधीमधून या ठिकाणी भक्त निवास उभे करण्यात आले या भक्तनिवासाचा उपयोग या ठिकाणी श्रद्धेने येणारे भाविक व नदीपलीकडे असलेले शेतकरी क्षणभर विश्रांती घेऊन पुढे जायचे. कधीकधी नदीला पाणी आले तर या ठिकाणी काही लोक आपले वास्तव्यास असायचे. कोरोना काळात बेला गावातील कोरोना रुग्णांसाठी कोरोन टाइन सेन्ट्रर पण बनविले होते . त्या वेळेस 50 रुग्ण 24 दिवसा साठी भक्त संपूर्ण सोइ नुसार निवासात होते आमदार पारवे यांनी या मंदिराला तीर्थक्षेत्र खंडातून दहा लाख रुपये देऊन मंदिर परिसरातील कामे सुरू केली आहे आणि पंधरा लाख रुपयांचा निधी अजून मंजूर होऊन प्रतीक्षेत आहे. यामध्ये नदीच्या वरील भागाचा विकास, मंदिराला रंगरंगोटी व भाविक भक्तांसाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या त्या गोष्टी येथे करण्यात यावे. शासनाने धार्मिकतेचा विचार करून भक्तांच्या सुविधेकरीता भक्तनिवास बनविले आहे परंतु बेला ग्रामपंचायतीचे सरपंच अरुण बालपांडे यांनी या भक्तनिवासामध्ये ग्रामपंचायत आलेले जिम साहित्याचे खाजगी तत्त्वावरती जिम सुरू केलेला आहे. वास्तविक पाहता युवकांच्या आरोग्याचा विचार करता जिम साठी बेलामध्ये असायला हवा होता कारण बेला गावात जुनी अखाडे होते ते बंद च्या मार्गावर आहे पण सरपंच याने अनेक वास्तु धूळ खात पडलेल्या ठेवल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या इमारती किरायाने देऊन त्यापासून उत्पन्न घेणारी ग्रामपंचायत, शेतकऱ्याच्या मालकीच्या जागेवर असणाऱ्या भक्तनिवासामध्ये ग्रामपंचायतीची खाजगी जिम सुरू करणारे सरपंच यांच्या बुद्धिमत्तेची कीव येण्यासारखेच आहे.
या जिमला लागूनच काही अंतरावर स्मशानभूमी आहे. यात्रेकरूंना व येथे येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांना क्षणभर विश्रांतीसाठी असलेल्या या जागेचा वापर खाजगी जिम साठी बेला येथील सरपंचांनी केलेला आहे 2800 चौरस फुटामध्ये बांधण्यात आलेल्या या भक्त निवासाला श्री. घनश्याम नारायण तिमांडे यांनी माणुसकीच्या नात्याने मंदिरालगत शेत जमीन भक्तनिवास करिता दिली आहे त्यावर भक्तनिवास उभे करण्यात आले आहे त्याचा उपयोग सर्वसामान्य लोक व भक्तासाठी व्हावा ही त्याची इच्छा आहे पण सरपंच अरुण बालपांडे यांनी पदाचा गैरवापर करून तिथे खाजगी जिम सुरू केला म्हणून याच शेतकऱ्याने ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवकाला नोटीस बजावून हा जिम खाली करण्यास सांगितले किंवा भक्तनिवास ग्रामपचायतीच आहे सिद्ध करावे असे त्या शासकीय कायदेशीर नोटीसीला ग्रामपंचायतीने उत्तर द्यावे न दिल्यास सरपंच सचिवा विरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल असे त्या शेतकऱ्यांने नोटीस द्वारे म्हणणे आहे गावकऱ्यांच्या मते भक्तनिवास हा भक्तांसाठीच खुला असावा आणि ग्रामपंचायत ने लावलेली कुलपे काढून भक्तनिवास भक्तांसाठी खुला करावा अशी मागणी गावकरी करीत आहे