कर्ज बाजारी शेतकऱ्यांची विष घेऊ आत्महत्या

कर्ज बाजारी शेतकऱ्यांची विष घेऊ आत्महत्या



मारेगाव -सचिन मेश्राम

मारेगाव - शेतात  होत आसलेली सततची नापीकी  व  वाढत चाललेला कर्जाचा डोंगर  यामुळे कर्ज कसे फेडावे व संसार कसा चालवा या विवंचनेत गेल्या अनेक वर्षापासून  असलेल्या  एका शेतकऱ्यांने  विषारी द्रव्ये पिऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली आहे. मारेगाव तालुक्यातील शिवनाळा (तेलाई पोड) येथील केशव हनगु रामपुरे वय ५० या शेतकऱ्यांने आपल्या शेतातही इतरां सारखे उत्पादन व्हावे व आपलीही आर्थिक प्रगती होऊन आपले कुटुंबही सुखी व्हावा यासाठी धडपड करत आपल्या मालकीच्या साडेतीन एकर मध्ये म्हणावे तसे उत्पादन होत नसल्यामुळे कर्ज दिवसेंदिवस  वाढत होते. त्यात घर खर्च डोईवर होत असल्यामुळे पुन्हा कर्जाने पछाडलेले केशव मागील काही दिवसांपासून विवंचनेत होते.अशातच दहा दिवसांपूर्वी त्यांनी स्वगृही आइसिकपॉवर नामक तणनाशक ग्रहण केले.त्यांना मारेगाव वरून चंद्रपूर येथे हलविण्यात आल्यानंतर प्रकृतीत सुधारणा होत मूळ गावी आणण्यात आले.मात्र दोन दिवसांपूर्वी पुन्हा प्रकृतीत बिघाड झाल्यानंतर यवतमाळ येथे हलविले.
यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मध्यरात्री मृत्यू झाला.मृतक शेतकरी केशव यांच्या पश्चात आई , पत्नी व दोन मुले आहेत.