मुलाच्या हातातुन आईचा हात सुटला आणि गेली वाहुन...मुलांच्या डोळ्यांसमोर आई गेली वाहून व गतप्राण.सायतखर्डा येथील नाल्याच्या पुरात आई गेली वाहून तर मुलगा बचावला.

मुलाच्या हातातुन आईचा हात सुटला आणि गेली वाहुन...

मुलांच्या डोळ्यांसमोर आई गेली वाहून व गतप्राण.
सायतखर्डा येथील नाल्याच्या पुरात आई गेली वाहून तर मुलगा बचावला.

   घाटंजी.... राजू चव्हाण 

सायतखर्डा येथील आई सुमित्रा भाऊराव चौधरी वय 46 व मुलगा भुजंग भाऊराव चौधरी वय 26 हे दोघेही आपल्या शेतातील काम आटोपून दि.7 ला सायंकाळच्या सुमारास घराकडे निघाले असताना गावाजवळील नाल्याला टोगंळ भर पाणी असतांना ते दोघेही एकमेकांच्या हातात हात घेऊन नाला पार करीत असताना अचानक नाल्याला मोठा लोंढा आला आणि क्षणार्धात दोघेही वाहुन गेले एक शेत अंतरावर मुलांच्या हातात एका झाडाची वेल सापडल्याने मुलगा वाचला परंतु तो आईला काही वाचवु शकला नाही .झालेल्या आपबिती ची माहिती गावात देताच सर्व शोधाशोध करून शेवटी आईचा मृतदेह सापडला.घटनास्थळी घाटंजी तहसील प्रशासन व पारवा पोलीस प्रशासन ने भेट शव विच्छेदनाकरीता घाटंजी ग्रा.रुग्नालय येथे पाठविण्यात आले व नंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करून सायतखर्डा येथे अंतिम संस्कार करण्यात आले.
    आपली आई आपल्याच हातातुन आणि तेही आपल्या डोळ्यासमोर गेल्याचे दुःख त्या मुलाने हंबरडा फोडत आहेत.या घटनेमुळे गावात व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतांच्या पश्चात पती, दोन मुले,एक मुलगी व एक स्नुशा आहेत.