देशी दारु दुकानाच्या नाहरकतमुळे खैरी गावात वातावरण पेटले

देशी दारु दुकानाच्या नाहरकतमुळे खैरी गावात वातावरण पेटले

दोन गटाच्या हाणामारीत तिघांनवर वडकी ठाण्यात गुन्हे दाखल


राळेगाव /प्रशांत भगत 

राळेगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या मोठी ग्रामपंचायत म्हणुन खैरी गावाची ओळख आहेत तसेच या गावातुन माजी प. स. सदस्यासह अन्य राजकीय महत्वाचे पदाधिकारी सुद्धा आहेत 
प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते मंडळी या गावात मोठ्या प्रमाणात आहेत 
खैरी या गावात देशी दारुचे दुकान स्थलांतर करन्यासाठी दारु व्यवसायीकानी अर्ज केला होता त्यासाठी ग्रामपंचायतने दि १६ नोव्हेबंर रोजी विशेष महिला ग्रामसभा आयोजीत केली होती त्यावेळी ग्रामसभेत दारुच्या नाहरकत ठरावाला शेकडो महिलांनी तिव्र विरोध करुण ठराव नामंजूर केला मात्र अध्यापही दारु दुकानाच्या नाहरकतीसाठीचे वातावरण गावात शांत झालेले दिसुन येत नाही
महीलांनी केलेला विरोध व वडकी ठाण्यात दिलेल्या धडकीला सहा महीण्याचा कार्यकाल पुर्ण झाला
त्यामुळे १५ ऑगस्ट नंतर होणाऱ्या ग्रामसभेत दारुच्या दुकानाचा नाहरकतच्या ठरावाच्या  हालचाली सुरु असुन मुद्दा उपस्थित होणार त्यामुळे त्याला विरोध न होण्यासाठी काही राजकीय पुढाकाऱ्यांने गावातले वातावरण पेटवले आहेत
त्याचे पडसाद  दि १४ ऑगस्ट रोजी खैरी गावात दोन गटात राडा झाला वडकी पोलीस स्टेशनला आलेल्या तक्रारीत आपण दारुच्या दुकानाला नाहरकत साठी विरोध केला म्हणुन माझ्याशी अश्लील शिविगाळ करुन वाद केला असी तक्रार डॉ संजय पवार यांनी वडकी पोलीस ठाण्यात दिली त्यावरून पंकज फुटाने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला व पंकज फुटाने यांला अक्ष्लीश शिविगाळ केल्याच्या  तक्रारीवरून डॉ संजय पवार सुनिल आसुटकर या दोघांनवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्ह्याचा तपास बिटजमादार रमेश आत्राम करित आहेत त्यामुळे ग्रामपंचायतमंधुन मिळणाऱ्या देशी दारुच्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी गावात नागरीकांनमध्ये गटबाजी राडे सुरु झाले त्यामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचे चिन्ह दिसुन येत आहेत
दारु दुकानाच्या नाहरकत प्रमाणपत्राला महिलांनी १६ नोव्हेंबर रोजीच्या महीला ग्रामसभेत कडाडुन तिव्र विरोध करून ठराव नामंजूर केला असल्यावर सुद्धा परत या ठरावा विषयी ग्रामपंचायत प्रशासनाला एवढा मोह कशापाई असा सवाल खैरी येथिल महिला व सुज्ञ नागरिक उपस्थित करीत आहेत


**खैरी येथे काही वर्षापुर्वी देशी भट्टी हटवली होती**

खैरी या गावात देशी दारुची भट्टी काहीवर्षापूर्वी होती, देशी भट्टीमुळे शाळकरी मुले व्यसनाधीन होत होती तसेच महीलांना दारुड्याचा त्रास होत होता त्यावेळी शिवसेनेचे दिवंगत नेते डॉ ज्ञानेश्वर राऊत यांनी पुढाकार घेऊन गावातील देशी दारुच्या दुकानाला विरोध करून ते दुकान खैरीतुन हटविले तेव्हापासुन खैरी गावात देशी दारुचे दुकान नाही परंतु आता दुकानासाठी प्रयत्न होतांना दिसत आहेत 


**ग्रामपंचायतला नाहरकतसाठी पाच अर्ज दाखल**

आठ हजार लोकसंख्येचे गाव सात ते आठ खेडेगाव जुळुन असलेल्या खैरी येथे दारु दुकान स्थलांतर करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्राच्या मांगणीसाठी जिल्ह्यातुन पाच अर्ज प्राप्त झाले आहेत त्यामुळे खैरी गावावर दारु व्यवसायिकांची नजर पडलेली आहेत परंतु ग्रामसभेच्या ठरावावर दारु दुकानाचे भविष्य ठरले आहेत त्यामुळे होणाऱ्या ग्रामसभेवर सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत

    ........ प्रतिक्रिया......

देशी दारु दुकानाकरीता नाहरकत प्रमाणपत्र मिळण्याबाबत अर्ज प्राप्त झालेले आहे परंतु अर्जावर अध्याप पर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही सदर अर्ज मासिक सभा व ग्रामसभेमध्ये ठेवुणच त्या संबधीची पुढील कार्यवाही करण्यात येईल
            जि. एन. भोयर
          ग्रामसेवक खैरी



ग्रामसभेत कायदा व सुव्यस्थेच्या दृष्टीने कोणीही वाद निर्माण करू नये तसेच गावात कोणीही वातावरण पेटवुन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल

           विजय महाले  
ठाणेदार पोलीस स्टेशन वडकी