लहान भावानेच केली दगडाने ठेचून मोठ्या भावाची हत्या..
------------------------------------------------
घाटंजी तालुक्यातील खळबळ जनक घटना.
------------------------------------------------
राजू चव्हाण -घाटंजी
घाटंजी - तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या ग्राम झटाळा येथिल खळबळ जनक घटना घडली असून भावामुळे आपली पत्नी सोडून गेल्याचा राग मनाशी धरून ती मला परत आणून दे या वादात दिनांक १७ ऑगस्ट रोज गुरुवारच्या दुपार दरम्यान लहान भाऊ मारोती खेत्रू मसराम वय ४२वर्ष याने दगडाने ठेचून त्याचाच मोठा भाऊ शालिक खेत्रु मसराम वय ४९ वर्ष याचा दगडाने ठेचून हत्या केल्याची खळबळ जनक घटना घडली.
झटाळा गावात मसराम कुटुंबीय वास्तव्यास होते.यात मागील दीड वर्षापूर्वी मारोतीची पत्नी घर सोडून निघून गेली होती. तेव्हापासून मसराम परिवारातील दोन भावात लहान सहान गोष्टीवरून वाद निर्माण होत होता.अश्यातच १७ ऑगस्ट गुरूवारला दुपार दरम्यान दोघा भावात वाद निर्माण झाला.यात माझी पत्नी तुझ्यामुळेच घर सोडून निघून गेली ती परत आणून दे असा वाद विकोपाला गेला.अश्यातच लहान भाऊ मारोती याने मृतक शालीक यांच्या डोक्यावर दगड घालून हत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच पारवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात हलविण्यात आले.मृतकाची पत्नी पार्वता शालीक मसराम यांनी पारवा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.त्यावरून पारवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी मारोती मसराम यास ताब्यात घेतले. या घटनेने झटाळा गावं चांगलेच हादरले असून मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेने पुढील तपास पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रविण लिंगाडे, जमादार संदीप महाजन,अनिल गिनगुले यांचे सह पारवा पोलीस करीत आहे.