चोरणारा अन घेणाराही पोलिसांच्या जाळ्यात:पहाटेच चोरले डेकोरेशन साहित्य

चोरणारा अन घेणाराही पोलिसांच्या जाळ्यात:
पहाटेच चोरले डेकोरेशन साहित्य


प्रशांत भगत -राळेगाव

 राळेगाव:--तालुक्यातील खैरी येथील एका डेकोरेशन व्यवसायिकाच्या गोडाऊन मधून साहित्य चोरणाऱ्या दोन संशयीताना वडकी पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडून चोरी केलेले साहित्य जप्त करण्यात आले ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे . रमेश अजाब आत्राम ( रा. खैरी), असे साहित्य
चोरणाऱ्याचे, तर विलास सरजू वाईकर, असे हे साहित्यघेणाऱ्याचे नाव आहे. खैरी येथील राहुल वडपल्लीवार यांच्या वडकी रोडवरील गोडावूनच्या शटरचे कुलूप तोडण्यात आले. त्यातील जवळपास ११ हजार रुपये किमतीचे लोखंडी पाईप चोरुन नेण्यात आले. हे संपूर्ण लोखंडी भंगार घेणारा विलास सरजू वाईकर याला विकले. हा प्रकार लक्षात येताच वडकी पोलिसात तक्रार देण्यात आली पोलिसानी तपासाची चक्रे वेगाने फिरवून दोघांनाही ताब्यात घेऊन विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.