अबब..घाटंजी बसस्थानकातून चक्क महामंडळाची बसच (एसटी) गेली चोरीला.
----------------------------------------------
जनतेत आश्चर्य व्यक्त करून सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न चिन्ह?
राजू चव्हाण - घाटंजी
घाटंजी - आज पर्यंत आपण अनेक प्रकारच्या चोऱ्या झालेल्या ऐकल्यात,अनेक वाहनासह ट्रक सुद्धा चोरीला गेल्याचे ऐकले.मात्र प्रथमतःच चक्क महामंडळाची बस (एसटी) चोरीला जाण्याची पहिलीच घटना असावी ती घाटंजी बसस्थानकात मुक्कामी असताना दिनांक १ ऑगस्ट मंगळवारला बाजाराच्या दिवशी रात्री जेमतेम ८ते९ वाजताच्या दरम्यान घटना घडली.
यवतमाळ वरून बस क्रमांक एम. एच.४० एन ९१४० चालक श्रीराम देशमुख व वाहक विजय बाभुळकर हे घाटंजीच्या बसस्थानक येथे आले व प्रवाश्यांना उतरविले ही बस मुक्कामी असल्याने ते नेहमी प्रमाणे सायंकाळचे जेवण करण्यासाठी बाहेर गेले व जेवण झाल्यानंतर आराम करण्यासाठी बस मध्ये असलेले बिस्तर आणण्यासाठी वाहक गेले असता ज्या ठिकाणी त्यांनी बस लावली होती त्याठिकाणी बसच नसल्याचे निदर्शनास आल्याने ते चक्रावून गेले.रात्रीचे खूप वेळ न झाल्याने बस चोरीला गेल्याच्या चर्चेला परिसरात चांगलेच उधाण आले.संपूर्ण बसस्थानक व परिसरात शोधाशोध करून बस दिसत नसल्याने अखेर घाटंजी पोलीस स्टेशन गाठून बस (एसटी) चोरीला गेल्याची फिर्याद चालक श्रीराम देशमुख यांनी नोंदवली.ही बाब वाऱ्यासारखी पसरली.यात घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी निलेश कुंभेकर राळेगाव वरून घाटंजी कडे येत असताना दुधाना गावाजवळील जंगलातून रस्त्याने विनालाईट बस जाताना दिसली तोच त्यांना शंका आली त्यांनी समय सूचकता बाळगत पोलिसाचे कौशल्य वापरून रस्त्याने येजा करणाऱ्या वाटसरूची मदत घेवून बसचा पाठलाग करीत पकडली. व बस चोरी करून घेवून चाललेला आरोपी नामे भूषण बबन लोणकर वय २९ वर्ष यास ताब्यात घेतले.आणि मोठा अनर्थ टळला.या घटनेच्या फिर्यादीवरून आरोपी भूषण बबन लोणकर यांचेवर कलम ३७९ भादवीअन्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास ठाणेदार निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनात पिएसआय.नागरगोजे,जमादार डाखोरे,राहुल खडांगले,निलेश कुंभेकर हे करीत आहेत.बसमध्ये ,बसस्थानकात चोरी होणे नवखे नाही मात्र चक्क बस चोरीला जाणे ही बाब आश्चर्य व्यक्त करणारी वाटत असून काही मध्ये तर हास्य पाहायला मिळाले.मात्र बसस्थानकातून एवढी मोठी बस चोरीला जाणे हे सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न चिन्ह निर्माण करणारे आहे.असे मस्त जनतेतून वर्तविल्या जात आहे.