नगर परिषदचा भोंगळ कारभार,शहरात कचऱ्याचे ढिगारे,नागरिकांचे आरोग्य धोक्यात

नगर परिषदचा भोंगळ कारभार,शहरात कचऱ्याचे ढिगारे,नागरिकांचे आरोग्य धोक्यात 

मनोज नवले -वणी

नगर पालिकेचे शहरातील साफसफाई व स्वच्छतेकडे दुर्लक्ष होऊ लागल्याने शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छतेचे धडे देणारी नगर पालिकाच शहर स्वच्छ ठेवण्यात असमर्थ ठरू लागली आहे. शहरातील बहुतांश प्रभाग व वस्त्यांमध्ये अस्वच्छता निर्माण झाली आहे. रस्त्यांच्या आजूबाजूला घाण कचरा जमा झाला असतांनाही त्याची विल्हेवाट लावली जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. रस्त्यांनी जाणे येणे करतांना नाकावर रुमाल ठेवण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. वणी शहरातील विराणी टॉकीज परीसरात रस्त्यावर कचरा साचला असून कचरा गोळा करणारी घंटागाडी येत नाही आणि कचरा रस्त्यावर साचला आहे घंटागाडी येत नसल्याने नागरीक रस्त्याच्या बाजूला कचरा फेकत आहे नगर परीषद चा एक कर्मचारी येवुन बारकोड स्कॅन करून जातो परंतु कचरा संकलन करणारी घंटागाडी येत नाही 
 घाण कचरा संकलन करणाऱ्या घंटा गाड्यांचेही वेळापत्रक कोलमडल्याने नागरिक खुल्या जागेत कचरा टाकतांना दिसत आहेत. शहरात जिकडे तिकडे अस्वच्छता निर्मण झालेली असतांना नगर पालिका प्रशासनाने मात्र आंधळेपणाचं सोंग घेतलं आहे.नगर परीषदच्या या प्रकाराने नागरिकांमधून चांगलाच संताप व्यक्त होतांना दिसत आहे. स्वच्छतेचे धडे देणाऱ्या नगर पालिकेने दिव्याखालचा अंधार दूर करून शहर स्वच्छ ठेवण्याची जबादारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असा सूर शहरातून उमटू लागला आहे.