वणी शहरातील नगरपरिषद शाळा व जिल्हा परिषद शाळेचा परिसर स्वच्छ करा

वणी शहरातील नगरपरिषद शाळा व जिल्हा परिषद शाळेचा परिसर स्वच्छ करा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी


मनोज नवले- वणी

वणी शहर नगर परिषदेच्या व जिल्हा परिषदेच्या शाळेतुन विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. या शाळेच्या परिसरात अनेक नागरिकांनी दुकाने थाटली आहेत, हे दुकानदार शाळेच्या परिसरात कचरा टाकुन घान करीत आहेत. सध्या पावसाचे दिवस असल्याने पावसामुळे कचरा सडून त्याचा उग्र वास येऊन लागला आहे. त्या वासामुळे विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर परिणाम होत आहे.

तसेच प्रसाधनगृहाची किती तरी दिवसा पासून स्वच्छता केली गेली नाही. उर्दु शाळेत जातांना विद्यार्थ्यांना खुप त्रास सहन करावा लागतो. त्या परिसरात रस्त्यावर भाजीवाल्यांनी दुकाने लावली आहे.  ते दुकानदार शाळेच्या आवारात खराब झालेला भाजीपाला टाकत आहे. त्या भाजीपाल्याची सडून दुगंध पसरली आहे. तरी त्या

परिसरातील दुकाने तात्काळ हटवुन शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात यावा, अन्यथा नाईलाजास्तव उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातु देण्यात आला आहे.यावेळी मुबीन शेख जिल्हा उपाध्यक्ष, विजय नगराळे, जिल्हा सरचिटणीस, सुर्यकांत खाडे तालुका अध्यक्ष, रामकृष्ण वैद्य अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.