भुमि अभिलेख कार्यालयामार्फत राळेगाव शहरातील घरकुल लाभार्थींच्या जागेची मोजणी करण्यास प्रारंभ
राळेगांव: प्रशांत भगत
राळेगांव:शहरातील गेली पाच ते सात वर्षापासून घरकुल लाभार्थांना त्यांच्या हक्काच्या जागेचे पट्टे देण्याबाबत प्रशासन नेहमीच दिरंगाई करीत होते, कित्येक लाभार्थी घरकुल साठी ताटकळत असुन लाभ घेता येईना.
काही दिवसाआधी शिवसेनेच्या(उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिष्टमंडळाने भुमि अभिलेख गाठुन नगरपंचायत कडून जागेची मोजणी संदर्भात चार लाख सत्तावीस हजार रुपयांपैकी दोन लाख रुपये भरुन सुद्धा जागेची मोजणी करण्यासंदर्भात दिरंगाई का& असा प्रश्न उप अधिक्षक भारतजी गवई साहेबांना शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केला त्यावर अपुरे अधिकारी वर्ग व मशिन मध्यें बिघाड असल्याने मोजणीस दिरंगाई होत असल्याचे साहेबांनी मान्य केले व लवकरच मोजणीची सुरुवात करण्यात येईल असे अभिवचन देण्यात आले होते. त्या विनंतीची दखल घेवून आज रोजी शिवाजी नगर मधून मोजणीचा श्रीगणेशा करण्यात आला. एकुनच घरकुल लाभार्थींच्या कित्येक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आज दिवस निघाला. तरी जे लाभार्थी आहे त्यांना घरकुलचा आजपर्यंत लाभ मिळाला नाही त्यांनी कागदपत्रांची पुर्तता करुन घरकुलचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना पक्षाकडून करण्यात येत आहे.मोजणीचा प्रारंभ करताना शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते त्यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेचे तालुका प्रमुख विनोद काकडे, शहर प्रमुख राकेश राऊळकर, शहर संघटक इमरान पठाण, व्यापारी आघाडीचे शहर प्रमुख सुनिल क्षिरसागर, दिपक येवले, अंकुश गेडाम, गणेश जांभुळकर व ईतर शिवसैनिक हजर होते. शिवसेना शिष्टमंडळाच्या भक्कम पाठिंब्यामुळे हक्काच्या जागेची मोजणी करुन पट्टे देण्याबाबत विषय आज मार्गि लागला अशी जनमानसात चर्चा सुरु आहे.