सायफळ वनरक्षकाच्या विरोधातील उपोषणाचा दुसरा दिवस..

सायफळ वनरक्षकाच्या विरोधातील उपोषणाचा दुसरा दिवस..
-----------------------------------------
 उपोषणकर्ता न्यायाच्या प्रतीक्षेत!
----------------------------------------

घाटंजी:राजू चव्हाण

घाटंजी - पारवा वनपरीक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या गोविंदपूर येथिल अमोल मोहनराव राठोड यांच्यावर होत असलेल्या हेतूपुरस्पर वचपा काढण्यासाठी होणाऱ्या कारवाईच्या विरोधात दिनांक २८ नोव्हेंबर पासून उपोषणास सुरवात केली असून आज दुसरा दिवस असतांना सुद्धा सबंधित विभागाच्या अधिकाऱ्याकडून कोणताही न्याय न मिळाल्याने ते न्याय मिळेल या प्रतीक्षेत आहे.
           शेतीला जोड व्यवसाय म्हणून उपोषणकर्ते यांचे कडे ट्रॅक्टर आहे.तो बहुधा शेतीच्या कामासाठी वापरले जाते.मात्र तो कुठेही रस्त्यात दिसला की,सायफळ येथिल कार्यरत महिला वनरक्षक मागील वचपा काढण्यासाठी आमच्या शेतातून ट्रॅक्टर नाक्यावर नेत त्यामध्ये चार ते पाच टोपले दगड भरून पारवा वनपरीक्षेत्र कार्यालयात ट्रॅक्टर लावला व खोटी कारवाई केल्याची उपोषण कर्त्याचे म्हणणे असून वारंवार होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून मी लोकशाही मार्गाने उपोषणाचा मार्ग अवलंबीत मला न्याय मिळावा व वनरक्षकावर कारवाई करावी अशी मागणी घेऊन दिनांक २८नोव्हेम्बर पासून उपोषणास सुरवात केल्याचे उपोषण कर्ते अमोल राठोड यांनी सांगितले आहे. माझ्या उपोषणाला प्रारंभ झाल्याच्या पहिल्या दिवशी पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी तिनवेळा भेट दिली.व वनपरीक्षेत्र अधिकारी पारवा हे दोन वेळा येऊन भेट दिली मात्र काहीच निस्पन्न झाल्याचे पुढे आले नाही.आज दुसऱ्या दिवशी वृत्त लिहीपर्यत कोणताच अधिकारी उपोषण स्थळी आले नसल्याचे उपोषण कर्त्याने सांगितले असून आपणास न्याय मिळेपर्यत आमरण उपोषण करणार असल्याचे उपोषणकर्ते अमोल राठोड यांनी सांगितले.