बहिणीला सासरी पोहोचविणाऱ्या भावाचा अपघातात एक पाय तुटून पडला
पाटण बोरी वार्ता
केळापूर तालुक्यातील घटना बहिणीला सासरी पोचवायला निघालेल्या एक युवकच्या दुचाकीने रूढा गावालगत विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारले धडक दिली या अपघातात त्या युवकाचा एक पायच पूर्णत तुटून पडला हि दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजता च्या सुमारास घडली व अनिल बावणे वय 35 वर्षे असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे तो केळापूर तालुक्यातील वडवाट येथील रहिवासी आहे शुक्रवारी दुपारच्या सुमारास तो आपली बहिण वर्षा व भाचा उद्धव या दोघाला झरी तालुक्यातील मांगुर्ला या गावी सोडण्यासाठी वडवाट या गावावरून दुचाकीने पाटणबोरी कडे निघाला दरम्यान पाटणबोरी व पिंपळखुटी मार्गावरील रूढा या गावाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट कार क्रमांक एपी.01.एई.05.69 ने जोरदार धडक दिली या अपघातात अनिल बावणे या युवकाचा एक पाय पूर्णपणे तुटला हा अपघात इतका भयंकर होता कि रस्त्यावर रक्ताचा सडाच पडला होता घटनेनंतर लगेच त्याला पाटणबोरी येतील एका खासगी दवाखान्यात आणले मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचाराकरिता यवतमाळ येथे रवाना करण्यात आले त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले...