दोन वेगवेगळ्या घटनेत एकाचा गळफास घेऊन आत्महत्या; एकाची मुत्युची झुंज

दोन वेगवेगळ्या घटनेत एकाचा गळफास घेऊन आत्महत्या; एकाची मुत्युची झुंज           


             मारेगावच्या दोन घटनेने तालुका हादरला

  मारेगाव तालुक्यातील खैरगाव (भेदी) येथे एका शेतकऱ्याने नापिकीला व खासगी कर्जाला कंटाळून स्वतःच्या शेतामध्ये झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज रविवारी (ता.27) घडली आहे.  आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की तालुक्यातील खैरगाव (भेदी) येथील शेतकरी  गोविंदरावपैकु आत्राम (वय 55) यांनी गावा लगत असलेल्या स्वतः च्या गळफास लावून आत्महत्या केली आहे. परंतु शेतामध्ये या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये मोठे नुकसान होऊन आता खासगी काढलेल्या कर्ज कसे फेडावे या विवेचनात त्यांनी रविवारी सकाळी शेतातील  एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

नापिकी व अतिवृष्टीचा फटका बसल्याने ते काही दिवसांपासून मानसिक तणावात होते. त्यातच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे गावात चर्चा आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, , दोन विवाहित मुली असा आप्ते परिवार पाठिमागे आहे. याघटनेची माहिती मारेगाव पोलिसांना  सरपंच तुळशीराम कुमरे यांनी दिली आहे. तर मौजा मुकटा येथील  वामन श्रावण इनामे वय अंदाजे ७०वर्ष  या व्यक्तीने विषारी औषध प्राशन केले अशी माहिती वामन यांच्या मुलाने फोन द्धारे प्रसार माध्यमांना दिली .त्यांना उपचारासाठी वरोरा येथे दवाखान्यात नेण्यात आले आहे.