वृद्ध महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या
मारेगाव तालुक्यातील पेंढारी शिवारातील घटना
मारेगावः आज दिनांक 14 मार्च रोज सोमवार पेंढरी येथील रुखमाबाई सूर्यभान टेकाम वय वर्षे 75 रा. पेंढारी या वृद्ध महिलेने दोरीच्या साहयाने झाडाला गळाफास घेवून आपली जीवन यात्रा संपविल्याची धक्कादायक घटना आज सकाळी सुमारे 8:30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे.
रुखमाबाई यांनी आत्महत्या काय केली यांचे कारण सध्या तरी समजु शकले नाही . वृद्ध महिला हि विधवा असून तिच्या पश्चात एक मुलगा दोन मुली असल्याची माहिती आहे . याघटनेची माहिती मारेगाव पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होवून या घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात येथे पाठविण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत...