दागीणे हिसकाविणारे चोरटे गजाआड
गोंदिया, तालुक्यातील जब्बारटोला-गिरोला मार्गावर हरभरा विकण्यासाठी बसलेल्या वृध्द महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र 21 जानेवारी रोजी दोन युवकांने जबरीने हिसकावून पळ काढला होता. घटनेची नोंद होताच गोंदिया पोलिसांनी तपासकार्याला सुरूवात केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध मोहिम राबवून आरोपींना जेरबंद केले. आदेश अरविंद रामटेके (20) व दिनेश बाबुलाल नेवारे (21) दोन्ही रा. गिरोला असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
जवळील जब्बारटोला येथील फुलवंता बाबुलाल चिखलोंडे ही महिला हरभरा विक‘ी करीत असताना दोन युवक तिच्या जवळ येवून हरभरा विकत घेतला. दरम्यान तिच्या गळ्यातील सोनसाखळी जबरीने हिसकावून पळ काढला. घटनेची तक्रार महिलेने गोंदिया ग‘ामीण पोलिस ठाण्यात केली. घटनेची गांभीर्य ल्क्ष्यात घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने तपासकार्याला सुरूवात करण्यात आली. दरम्यान आदेश रामटेके व दिनेश नेवारे या दोघांनी महिलेची सोनसाखळी हिसकावली आहे. ते दुचाकीने गोंदियात संचार करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून आदेश व दिनेश या दोघांना रेलटोली येथून ताब्यात घेतले. सहनिशा करीत त्याची विचारपूस केली.
मात्र त्यांनी ‘तो मी नव्हेच’ चा पावित्रा घेतला. मात्र पोलिसी हिसका दाखवताच आदेश रामटेके यांनी आम्ही दोघांनी जब्बारटोला येथील महिलेची सोनसाखळी हिसकावल्याची कबूली दिली. तत्पूर्वी त्या महिलेकडून 10 रुपयाची हरभरा जुडी घेतली. तिच्या गळ्यात सोन्याचे दागिणे दिसल्याने पुन्हा 200 रुपयाचे नोट देवून हरभर्याची जुडी मागितली. सदर महिला सुटे पैसे देण्याच्या कामाला लागली असताना तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढल्याचे सांगितले. यावरून दोन्ही आरोपींना गोंदिया ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले