जैताई मंदिराचे पुजारी साधुबुवा संताने ह्यांना देवाज्ञा
वणी येथील जैताई मंदिराचे देवीचे परमभक्त पुजारी
साधुबुवा संताने ह्यांना गणराज्य दिनी रात्री ८ च्या सुमारास मंदिरातील त्यांच्या निवासस्थानी देवाज्ञा झाली.गेल्या दोन महिन्यां पासून वृद्धपकाळामुळे ते आजारी होते. वर्धेला कन्या गीताकडे राहून औषधोपचार घेतल्यानंतर त्यांना आज सायं. ५ वाजता वणीला आणण्यात आले.वणीला पोहचताच तीन तासानंतर हा देवीभक्त देवीचरणाशी कायमचा लीन झाला.
त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगी गीता , जावई ,
नातवंड आणि त्यांच्यावर प्रेम करणारे अनेक भाविक आहेत. त्यांची अंत्ययात्रा मंदिरातून गुरुवार दि. २७ ला सकाळी 11 वाजता निघेल. अशी माहिती मिळाली आहे.