डॉ. टी. व्ही. गेडाम यांचे निधन

डॉ. टी. व्ही. गेडाम यांचे निधन

    





नागपूर,   युगांतर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ इतिहासकार व महानुभाव पंथाचे गाढे अभ्यासक, लेखक Dr. T. V. Gedam डॉ. टी. व्ही. गेडाम यांचे वयाच्या 98 व्या वर्षी 26 जानेवारीला निधन झाले. मागील वर्षीच्या दीक्षान्त समारंभातच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने त्यांना डी. लिट. पदवी प्रदान केली होती. 
महाराष्ट्राचे माजी उपमु‘यमंत्री व युगांतर शिक्षण संस्थेचे संस्थापक बाळासाहेब तिरपुडे यांचे डॉ. गेडाम विश्वासू सहकारी होते. संस्थेच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी त्यांनी 1962 ते 1995 पर्यंत सांभाळली. त्यानंतर ते आजपर्यंत संस्थेचे उपाध्यक्ष होते. ‘चातुर्वर्ण्य व्यवस्था व दहशत,’ ‘कथा आरक्षणाची व्यथा वंचितांची,’ ‘अस्पृश्यता व तिचे मूळ’ इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली. रा. सा. ठवरे यांच्यावरील ‘निष्काम कर्मयोगी’ या पुस्तकाचे लेखन व संपादन, बाळासाहेब तिरपुडे यांच्यावरील ‘स्वाभिमान’ या चरित्रग‘ंथाचे संपादन त्यांनी केले आहे.
विदर्भ साहित्य संघाचे सचिव, उपाध्यक्ष व कोषाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. नागपूरच्या मॉरिस महाविद्यालयात इतिहासाचे प्राध्यापक म्हणून 1956 ते 1982 या काळात ते कार्यरत होते. नागपूर विद्यापीठाच्या विद्वत परिषद, सिनेट, इतिहास अभ्यासमंडळाचे सदस्य आदी पदांवरही त्यांनी काम केले होते. 1955मध्ये तळोधी बाळापूर येथे महानुभाव साहित्य संमेलनाचे व महानुभाव महंत संमेलनाचे ते आयोजक होते. युगांतर शिक्षण संस्थेच्या वतीने गुरुवारी शोकसभेचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष राजकुमार तिरपुडे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या सभेत डॉ. गेडाम यांच्या निधनावर अनेकांनी शोकसंवेदना व्यक्त केला