सांख्यिकी अधिकारी महेंद्र टिकरे यांचे हृदयविकाराने निधन
नागपूर, दि. 27 : अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे प्रादेशिक कार्यालयाचे संशोधन सहायक महेंद्र सीताराम टिकरे यांचे हृदयविकाराने दु:खद निधन झाले. ते 56 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी प्रतिभा, मुलगा रिपुघ्न आणि मुलगी मानसी असा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर अंबाझरी येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
अर्थ व साख्यिकी संचालनालयाच्या नागपूर विभागातर्फे महेंद्र टिकरे यांना सहसंचालक कृष्णा फिरके यांच्या उपस्थितीत अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. श्री. टिकरे हे सांख्यिकी विभागात वर्ग चार या पदापासून संशोधन सहायक या पदापर्यंत कार्यरत होते. कर्तव्यदक्ष आणि नेहमी कार्यतत्पर असलेले कर्मचारी-अधिकारी अशी त्यांनी सांख्यिकी संचालनालयात वेगळी ओळख निर्माण केली होती. सांख्यिकी विभागातर्फे उपसंचालक मिलिंद नारिंगे, संशोधन अधिकरी श्री. रुपाली कुकडकर तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे आज श्रद्धांजली वाहण्यात आली.
*****