आनंद नगर वेदधारनी मंदिराजवळील रस्त्याचे आमदार मदन येरावार यांचे हस्ते भुमीपुजन.
यवतमाळ शहरातील प्रभाग क्रमांक २३ मधील आनंद नगर वेदधारनी मंदिर जवळच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी आज भुमीपुजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला उपस्थित आमदार मदन येरावार मा.रीता गजानन घावतोडे नगरसेविका मधुसुदन कोवे अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच उपस्थित होते.
आमदार मदन येरावार यांच्या विकास निधीतून रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल प्रभाग तेविच्या नगरसेविका सौ.रिता गजानन घावतोडे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
रस्ता भुमीपुजन करतांना मा.मधुसुदन कोवे अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी प्रत्यक्ष कुदळ मारुन उद्घाटन केले.तुकड्याची झोपडी या स्मरणिका साठी शुभेच्छा पत्र देण्याचे आश्वासित केले.लवकरात लवकर रस्ता डांबरीकरण करण्यासाठी काम सुरू होईल असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाला गजानन घावतोडे,किशोर लोणकर,दिपक फाले,राजु गोहणे,योगेश अडाणे,पिंटु खोब्रागडे,हांडे,मंडकमाळे आनंद नगर परिसरातील महिला भगिनी आणि युवक उपस्थित होते.