कृषिदुतांनी शेतकऱ्यांना दिले कलम निर्मितीचे प्रात्यक्षिक

कृषिदुतांनी शेतकऱ्यांना दिले कलम निर्मितीचे प्रात्यक्षिक

उमरखेड/प्रतिनिधी

येथील ओम हायटेक नर्सरीत कृषीदुतांनी शेतकऱ्यांना कलम निर्मितीचे प्रात्यक्षिक देण्यात आले.ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत उमरखेड येथील कृषी महाविद्यालयाच्या सातव्या सत्रातील कृषीदुतांनी हे प्रात्याक्षीक शेतकऱ्यांसमोर सादर केले.
     त्यामध्ये प्रामुख्याने आंबा कलम निर्मिती या विषयावर आंबा पिकाबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.त्यात आंबा कलम निर्मितीवर अनुकूल हंगाम , वातावरण, वेगवेगळ्या पद्धती ,आंब्याच्या जाती यावर प्रकाश टाकण्यात आला. सध्या स्थितीत उद्भवलेली कोरोना स्थितीत कोविड १९ च्या त्रिसूत्री नियमांचे पालन करण्यात आले.
       या प्रात्यक्षिक कार्यक्रमात महविद्यालायचे प्राचार्य एस. के. चिंताले, व प्राध्यापक वाय.एस. वाकोडे, प्रा. ए.बी. तामसेकर, विषय तज्ञ प्राध्यापिका एम.टी. चव्हाण,कृषी कार्यक्रम अधिकारी प्रा.आर.के. सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी कन्या कोमल काळबांडे,कृषीदुत शिलवान वाढवे,आशिष कदम,यांनी आंब्याच्या पिकाबाबत प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
    यावेळी ओम नर्सरी संचालक रमेश बोरगडे ,यांच्या नर्सरीची मदत घेण्यात आली.

       *फोटो*