दिल्ली येथे झालेल्या निर्घृण हत्याप्रकरणी
उमरखेड येथील एम आय एम पक्ष्याच्या वतीने
राष्ट्रपती भवन न्यू दिल्ली यांना उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्या मार्फत निवेदन
उमरखेड/प्रतिनिधी
दिल्ली येथे 27 ऑगस्ट रोजी राबिया सैफी नामक युवतीवर क्रूर वृत्तीचे अत्याचार करून निर्दयी निर्गुण हत्या करण्यात आली, तसेच सामूहिक अपराध करून राबिया सैफी ह्या मुली वर पन्नास जागी चाकूचे वार करून तिच्या शरीराचे दर्शनीय अवयव कापून असे हैवानियत कृत्य करून तिला जीवाने मारण्यात आले .
या घटनेच्या निषेधार्थ उमरखेड येथील एम आय एम पक्षाचे तालुका अध्यक्ष एजाज खान जनाब यांच्या नेतृत्वात आज उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्यामार्फत राष्ट्रपती भवन न्यू दिल्ली यांना निवेदन देण्यात आले.
मृतक मुलीचे पूर्ण नाव राबिया सैफी मोहम्मद शमीद वय 21 वर्ष राहणार संगम विहार दिल्ली .
राबिया सैफी ही दिल्ली येथे पोलीस विभागात डिफेन्स मध्ये नोकरी करत होती.नोकरीला लागून राबिया ला फक्त चार महिने झाले होते.
नोकरी करून नेहमीप्रमाणे राबिया आपल्या घरी परत येत होती.त्या दरम्यान काही निर्दयी लोकांनी मिळुन तिच्यावर प्राणघातक चाकूने शरीराच्या पन्नास जागेवर हल्ला केला व राबिया या तरुणीला जीवाने ठार केले.
या भयानक घटनेची सविस्तर माहिती घेऊन रिटायर न्यायाधीश ची कमेटी बसवुन अपराधींना कठोर मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी.करीता उमरखेड येथील एम आय एम पक्षाच्यावतीने कार्यकर्त्यांकडून घटनेच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले.याप्रसंगी एम आय एम पक्षाचे तालुका अध्यक्ष एजाज खान जनाब,सय्यद इरफान, माजी जिल्हाध्यक्ष नगरसेवक मुजीब बागवान,नगरसेवक तथा गटनेता जलील कुरेशी . नगरसेवक रसूल पटेल,नगरसेवक सय्यद अफसर,नगरसेवक वसीम शेख व पदाधिकारी अजीज पटेल, अहमद पटेल,असलम शेख, वजात मुजावर इत्यादी एम आय एम पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
*फोटो*